Join us
Daily Top 2Weekly Top 5

"खूप मिस करतोय दादा"; अजित पवारांच्या आठवणीत सूरज चव्हाण भावुक, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 11:54 IST

अजितदादांनी त्यांच्या कारकीर्दीत सामान्य जनतेचे अनेक प्रश्न सोडवले. 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता सूरज चव्हाणला अजितदादांनी घर बांधून दिलं होतं. सूरजने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन अजितदादांची आठवण जागवली आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. अजित दादांचं जाणं आजही महाराष्ट्राला खरं वाटत नाही. कार्यकर्ते दादांची आठवण काढत असतात. अजितदादांचं निधन झाल्यावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सध्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळत आहेत. अजितदादांनी त्यांच्या कारकीर्दीत सामान्य जनतेचे अनेक प्रश्न सोडवले. 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता सूरज चव्हाणला अजितदादांनी घर बांधून दिलं होतं. सूरजने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन अजितदादांची आठवण जागवली आहे.

सूरज चव्हाणने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात तो आणि त्याची पत्नी दिसत आहेत. सूरजने फुलांनी सजलेली ''दादा'' ही अक्षरं काढली आहेत. याशिवाय नवीन घरात सूरजने दादांचा फोटो लावून त्यांच्यासमोर हात जोडले आहेत. सूरजने दादांच्या फोटोंना हार घातलेला दिसतोय. सूरजने या व्हिडीओखाली कॅप्शन लिहिलंय की, ''दादा, कायम आठवणीत राहणार तुम्ही. खूप मिस करतोय दादा.'', अशा शब्दांत सूरजने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अजितदादांच्या निधनानंतर सूरजने त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. तो लिहितो की, ''मित्रांनो माझा देव चोरला आज... मित्रांनो मला अजिबात विश्वास होत नाहीये की आपले लाडके कार्यसम्राट अजित दादा आपल्यात नाहीयेत…माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांधून दिलं…माझी काळजी घेतली..मला नवीन आयुष्य मिळवून दिलं… अजित दादांसारखा देव माणूस या जगात नाही…याचं मला लई वाईट वाटतय…लई दुःख होतंय… माझ्या आई आप्पा नंतर अजित दादाने माझ्यासाठी इतकं केलं मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन... ''

English
हिंदी सारांश
Web Title : 'Miss you Dada': Suraj Chavan emotional, remembers Ajit Pawar.

Web Summary : Suraj Chavan, winner of Bigg Boss Marathi 5, shared a video remembering Ajit Pawar. Pawar helped Chavan build a house. Chavan expressed his grief and gratitude, saying he deeply misses 'Dada'.
टॅग्स :अजित पवारमृत्यूमहाराष्ट्रविमान दुर्घटनाबिग बॉस १९बिग बॉस मराठी ६