Join us

"माझ्या कंबरेला त्याने चुकीचा स्पर्श केला अन्..."; सुपरस्टारचं संतापजनक कृत्य, अभिनेत्रीकडून पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 16:57 IST

एका सुपरस्टार अभिनेत्याने सर्वांसमोर स्टेजवरच अभिनेत्रीला चुकीचा स्पर्श केला. त्यामुळे संताप व्यक्त करत अभिनेत्री भावुक झाली आहे

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अंजली राघवने भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लखनऊमध्ये एका लाईव्ह कार्यक्रमादरम्यान पवन सिंह यांनी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप तिने केला असून, या घटनेमुळे दु:खी होऊन तिने भोजपुरी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या कृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पवन सिंहवर सर्वजण संताप व्यक्त करत आहेत.

पवन सिंह आणि अंजली यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये पवन सिंह स्टेजवर असताना अंजलीच्या कंबरेला स्पर्श करताना दिसतो. ही घटना घडल्यानंतर अंजलीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरे जावे लागले, तसेच तिच्या चारित्र्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. या सर्व प्रकारामुळे व्यथित झालेल्या अंजलीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून आपली बाजू मांडली.

अंजलीची सांगितली काळी बाजू

अंजलीने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, 'सईया सेवा करे' या गाण्यासाठी काम करण्यापूर्वी तिने पवन सिंह यांच्यासोबत दुहेरी काही शंका दूर केल्या. गाण्याचं शूटिंग कोणताही अडथळा न येता सुरळीत पार पडलं. मात्र, लखनऊमध्ये गाण्याच्या प्रमोशनल कार्यक्रमात पवन सिंह यांनी तिच्या ड्रेसला काहीतरी चिकटले असल्याचे खोटं कारण सांगून तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. नंतर तिला कळले की तिच्या ड्रेसवर काहीच नव्हते. त्यामुळे अंजलीच्या चारित्र्यावर लोकांनी शिंतोडे उडवले. त्यामुळे अंजलीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिची व्यथा मांडली आहे.

या घटनेनंतर तिला प्रचंड राग आला, पण पवन सिंह त्या भागात राहत असल्याने आणि त्यांच्या पीआर टीमचा प्रभाव लक्षात घेता तिने तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तिने व्हिडीओत म्हटलं की, "मी खूप दुखी झाली आहे. या इंडस्ट्रीत काम करताना मला खूप आनंद झाला, पण आता मला हे सर्व थांबवायचे आहे. मी भोजपुरी इंडस्ट्री सोडत आहे." अंजलीच्या या निर्णयामुळे तिचे चाहते निराश झाले आहेत, तर अनेकांनी तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. आता याप्रकरणी पवन सिंहवर कोणती कारवाई होणार का, हे पाहावं लागेल.

टॅग्स :छळटेलिव्हिजनटिव्ही कलाकारबॉलिवूडमराठी अभिनेता