Join us

'शक्तिमान'फेम अभिनेत्रीचा पुरस्कार सोहळ्यात झाला अपमान; Video होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 17:30 IST

Vaishnavi mahant: ९० च्या दशकात 'शक्तिमान' ही मालिका तुफान हिट झाली. या मालिकेत अभिनेता मुकेश खन्ना आणि वैष्णवी महंत ही जोडी मुख्य भूमिकेत झळकली होती.

९० च्या काळात अनेक मालिका तुफान गाजल्या. यातील काही मालिका अशा आहेत ज्या विसरणं प्रेक्षकांना कधीच शक्य होणार नाही. त्यातलीच एक मालिका म्हणजे 'शक्तिमान'. ९० च्या दशकात ही मालिका तुफान हिट झाली. या मालिकेत अभिनेता मुकेश खन्ना आणि वैष्णवी महंत ही जोडी मुख्य भूमिकेत झळकली होती. मुकेश खन्ना यांनी या मालिकेत शक्तिमानची भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री वैष्णवी यांनी गीता विश्वास ही व्यक्तिरेखा साकारली होती. आजही कलाविश्वात त्यांचा चांगला वावर असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, अलिकडेच एका पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याचं समोर आलं आहे. वैष्णवी यांनी स्वत: एक व्हिडीओ शूट करुन याविषयीची माहिती दिली आहे.

वैष्णवी महंत यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांना आलेल्या वाईट अनुभवाचं कथन केलं आहे.  "अलिकडेच मला Mumbai Global Achievers Award या पुरस्कार सोहळ्यात आमंत्रित करण्यात आलं होतं. परंतु, या कार्यक्रमात पोहोचल्यानंतर मला अपमानास्पद वागणूक मिळाली. या अवॉर्ड फंक्शनमध्ये मला बेस्ट अॅक्ट्रेस फॉरएव्हर हा पुरस्कार  मिळणार होता. मात्र, मी पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर गेल्यानंतरही त्यांनी माझ्या जागी वंदना असं नाव घेण्यास सुरुवात केली. हे एकदा नाही तीन ते चार वेळा झाला", असं वैष्णवी म्हणाला.

पुढे त्या म्हणतात, "मी कोणत्याही पुरस्कारासाठी हापापलेली नाही. पण जर माझ्या कामाचा सन्मान केला जात असेल तर त्याचा मान राखणं माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी या पुरस्कार सोहळ्यात गेले होते. पण, पुरस्कार घेण्यासाठी मी स्टेजवर गेल्यानंतरही त्यांना माझं नाव नीट माहित नव्हतं. ते सतत वंदना, वंदना करत होते. त्यामुळे मी हा पुरस्कार घेण्यास नाकारलं. जर लोकांना माझं नावच माहित नाहीये. तर, तो पुरस्कार घेऊन मी काय करु?"

दरम्यान, वैष्णवी यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वैष्णवी या हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी 'शक्तिमान'सोबतच 'कसौटी जिंदगी की', 'हम पाच फिर से', 'परदेस में हैं मेरा दिल' अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही त्या झळकल्या आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारबॉलिवूड