Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा उघडणार 'बिग बॉस ओटीटी'च्या घराचं दार; जाणून घ्या कधी सुरु होणार तिसरं पर्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 14:21 IST

टेलिव्हिजनवरील 'बिग बॉस' संपलं की चाहत्यांना  बिग बॉस ओटीटीच्या सीझनची आतुरता असते. 

सलमान खानचा सर्वात वादग्रस्त शो 'बिग बॉस'चा प्रत्येक सीझन लोकांना आवडतो. टीव्हीवर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केल्यानंतर आता बिग बॉस ओटीटीवरही सुरू झाला आहे. आतापर्यंत 'बिग बॉस ओटीटी'चे दोन सीझन आले आहेत. आता बिग बॉस ओटीटीचा तिसरा सीझन कधी येतोय याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. यातच तिसरा सीझन कधी सुरू होणार याबद्दल मोठं अपडेट समोर आलं आहे. महत्वाचं म्हणजे या सीझनचं काम सुरू झालं आहे.

'बिग बॉस ओटीटी'चे पहिले दोन सीझन प्रेक्षकांचे आवडते ठरले. आता पुढील सीझनबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. 'बिग बॉस ओटीटी'चं तिसरा सीझन सुरू होण्यास फक्त एक महिना राहिला आहे. अर्थातच 'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या पर्वाचा प्रीमियर पुढच्या महिन्यात म्हणजेच मेमध्ये होणार आहे. टेली फ्यूजनच्या वृत्तानुसार, १५ मेपासून 'बिग बॉस ओटीटी'चा तिसरा सीझन सुरू होणार आहे. मात्र, अद्याप अधिकृतरित्या तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. या सीझनची पूर्वीपेक्षाही अधिक क्रेझ वाढली आहे.

यासोबतच 'बिग बॉस ओटीटी ३' मध्ये सहभाग घेणाऱ्या अनेक स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. 'कुछ कुछ होता है' मध्ये शाहरुख खानच्या मुलीची भूमिका साकारणारी सना सईद यात सहभाग घेणार आहे. ३५ वर्षीय सना आता बिग बॉस ओटीटीमधून कमबॅक करण्याच्या तयारित आहे. मात्र अद्याप सनाकडून या बातमीवर शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही. यासोबतच इतरही काही प्रसिद्ध कलाकार सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

दरम्यान 'बिग बॉस ओटीटी'च्या पहिल्या पर्वाची विजेता ही दिव्या अग्रवाल ठरली होती. तर दुसऱ्या पर्वानं एक इतिहास रचला. पहिल्यांदाच 'बिग बॉस'च्या इतिहासात वाइल्ड कार्ड स्पर्धक विजेता झाला. बिग बॉसच्या घरात वाइल्डकार्ड एन्ट्री घेतलेला स्पर्धक एल्विश यादव हा यंदाच्या 'बिग बॉस ओटीटी २' चा विजेता ठरला.  'बिग बॉस सीझन 17' संपल्यानंतर आता बिग बॉस ओटीटीचा तिसरा सीझन चर्चेत आहे. टेलिव्हिजनवरील 'बिग बॉस' संपलं की चाहत्यांना  बिग बॉस ओटीटीच्या सीझनची आतुरता असते.  

टॅग्स :बिग बॉससलमान खानसेलिब्रिटीटिव्ही कलाकारबॉलिवूडसोशल मीडिया