Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 17चं विजेतेपद जिंकल्यानंतर मुनव्वर फारुकीची स्पेशल पोस्ट, सलमान खानचा उल्लेख करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 09:47 IST

बिग बॉसचं विजेतेपद जिंकल्यानंतर पहिल्यांदाच मुनव्वर फारुकीने स्पेशल पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Bigg Boss 17 चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. रविवारी रात्री उशीरा बिग बॉसच्या 17 व्या पर्वाचा विजेता घोषित करण्यात आला. अभिषेकला मागे टाकत मुनव्वर फारुकी या पर्वाचा विजेता झाला. सुरुवातीपासून ट्रॉफी डोंगरीमध्येच जाणार असे मुनव्वर म्हणत होता आणि त्याने ते करुन दाखवले. स्वत:च्या वाढदिवशी मुनव्वर एक चमकती ट्रॉफी, ब्रँड न्यू महागडी गाडी आणि ५० लाख रुपये डोंगरीमध्ये घेऊन गेला. विजयानंतर सोशल मीडियावरून मुनव्वर फारुकीवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. बिग बॉसचं विजेतेपद जिंकल्यानंतर पहिल्यांदाच मुनव्वर फारुकीने स्पेशल पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

‘बिग बॉस 17’च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरल्यानंतर मुनव्वर फारुकीची ही पोस्ट खास ठरली आहे. त्याने या पोस्टद्वारे सलमान खानबरोबरचा फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यानं लिहलं, 'सर्वांचे खूप-खूप आभार. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे ट्रॉफी अखेर डोंगरीमध्ये पोहोचली आहे. बडे भाई सलमान खान यांचे तुमच्या खास मार्गदर्शनाबद्दल विशेष धन्यवाद'. त्याची ही पोस्ट व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

मुनव्वर फारुकीच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोमध्ये सलमान आणि मुनव्वर फारुकी दोघेही अगदी आनंदात ट्रॉफीसह पोज देताना दिसले.या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटद्वारे व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. इन्स्टाग्रामवर ११ मिलियनहून अधिक फॉलोअर्स असणाऱ्या मुनव्वरचे चाहते त्याच्या या विजयानंतर खूपच खूश आहे. सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा देण्यासाठी अनेक पोस्ट शेअर केल्या जात आहेत.  

रिअ‍ॅलिटी शो जिंकण्याची मुनव्वरची ही पहिली वेळ नव्हे, याआधी त्याने कंगना रणौतचा शो 'लॉकअप'ही जिंकला आहे.  मुनव्वर फारुकी हा स्टँडअप कॉमेडियन, रॅपर आणि गायक आहे. पण. कॉन्ट्रोव्हर्सीशी मुनव्वरचं नातं नवीन नाहीये. साधारण महिन्यापेक्षा अधिक काळ त्याला तुरुंगाची हवा खाली लागली होती.  2021 मध्ये राजकीय नेत्यांवर आणि हिंदू देवी देवतांवर आक्षेपार्ह टिप्पणी   केली होती. त्यानंतर त्याला इंदोरमधून अटक करण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणामुळे त्याचं नाव चर्चेत राहिलं आहे.  

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटीसलमान खानटेलिव्हिजनटिव्ही कलाकारसोशल मीडिया