Join us
Daily Top 2Weekly Top 5

BBM 6: खेळ खेळून घर गाजवलं, पण 'बिग बॉस मराठी ६'च्या महाअंतिम सोहळ्यातून गायब झाली 'ही' नावं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 20:53 IST

ग्रँड फिनालेमध्ये एक गोष्ट सर्वांच्या नजरेत आली.  'बिग बॉस मराठी ६' मध्ये झळकलेले काही स्पर्धक ग्रँड फिनालेला गैरहजर असलेले दिसत आहेत. कोण आहेत हे स्पर्धक?

'बिग बॉस मराठी ६' च्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली आहे. राकेश बापट, विशाल कोटियान, अनुश्री माने, तन्वी कोलते आणि दिपाली सय्यद या पाच जणांपैकी एक स्पर्धक 'बिग बॉस मराठी ६' च्या ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरणार आहे. अशातच ग्रँड फिनालेमध्ये एक गोष्ट सर्वांच्या नजरेत आली. ते म्हणजे 'बिग बॉस मराठी ६' मध्ये झळकलेले काही स्पर्धक ग्रँड फिनालेला गैरहजर असलेले दिसत आहेत. कोण आहेत हे स्पर्धक?

'बिग बॉस मराठी ६'च्या ग्रँड फिनालेला स्टेजवर आजपर्यंत घराबाहेर गेलेले इतर स्पर्धक दिसत आहेत. या स्पर्धकांमध्ये प्राजक्ता शुक्रे, सोनाली राऊत, करण सोनावणे, रुचिता जामदार, संकेत पाठक हे पाच स्पर्धक मात्र गैरहजर दिसत आहेत. या पाच जणांची अनुपस्थिती सर्वांच्या नजरेत आली आहे. हे पाच जण का नाही आले यामागचं कारण गुलदस्त्यात आहे. परंतु 'बिग बॉस मराठी ६'चं घर गाजवणारे हे पाच जण महाअंतिम सोहळ्याच्या महत्वाच्या दिवशी का नाही आले, असा अनेकांना प्रश्न पडत आहे. ग्रँड फिनालेची दणक्यात सुरुवातरितेश देशमुख पुन्हा एकदा 'बिग बॉस मराठी ६'च्या ग्रँड फिनालेचं त्याच्या खास अंदाजात सुत्रसंचालन करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे 'बिग बॉस मराठी ६'च्या या ग्रँड फिनालेला अभिषेक बच्चनने खास हजेरी लावली. याशिवाय जिनिलिया देशमुखही रितेशसह धमाल करताना दिसणार आहे. रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमाचं प्रमोशनही आज 'बिग बॉस मराठी ६'मध्ये होणार आहे. त्यानिमित्त अभिषेक आणि जिनिलिया 'बिग बॉस मराठी ६'च्या टॉप ५ स्पर्धकांशी गप्पा मारणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : BBM 6 Finale: Key contestants missing from the grand finale!

Web Summary : Big Boss Marathi 6 grand finale sees five finalists. Four contestants, including Prajakta Shukre and Sonali Raut, are notably absent. Riteish Deshmukh hosts; Abhishek Bachchan attends.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६टेलिव्हिजनटिव्ही कलाकारतन्वी कोलते