काल 'बिग बॉस मराठी ६'मध्ये धक्कादायक एविक्शन झालं. नॉमिनेट असलेल्या सात सदस्यांपैकी रुचिता जामदारला 'बिग बॉस मराठी ६'मधून बाहेर पडावं लागलं. रुचिताचा गेम गेल्या दोन आठवड्यांपासून चांगलाच बिघडला होता. रितेश देशमुख तिला वारंवार भाऊचा धक्क्यावर समजावत होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून रुचिता फक्त विशालभोवतीच दिसत होती. परिणामी, कमी वोट्स मिळाल्याने रुचिताला घराबाहेर पडावं लागलं. रुचिताने घराबाहेर आल्यावर पोस्ट लिहून प्रेक्षकांची माफी मागितली.रुचिताने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून सांगितलं की, ''बिग बॉसच्या या घरात प्रत्येक गोष्ट मी मनापासून केली आणि खूप वेळा नॉमिनेट झाले तरी माझ्यावर प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांनी मला या खेळात लढायला बळ दिलं. मी घरात ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील त्या बद्दल तुमची मनापासून माफी मागते. आजचं एविक्शन माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे, पण जनतेचा निर्णय मला मनापासून मान्य आहे. माझ्या या प्रवासात माझी साथ दिल्या बद्दल खूप खूप आभार !''
Web Summary : Evicted from 'Bigg Boss Marathi 6,' Ruchita Jamdar apologized to viewers for her mistakes. She acknowledged her game faltered, particularly due to her focus on Vishal, and accepted the public's decision. She thanked fans for their support during her journey.
Web Summary : 'बिग बॉस मराठी 6' से बाहर होने के बाद, रुचिता जामदार ने अपनी गलतियों के लिए दर्शकों से माफी मांगी। उन्होंने स्वीकार किया कि विशाल पर ध्यान केंद्रित करने के कारण उनका खेल लड़खड़ा गया, और जनता के फैसले को स्वीकार किया। उन्होंने अपनी यात्रा के दौरान प्रशंसकों को उनके समर्थन के लिए धन्यवाद दिया।