Join us
Daily Top 2Weekly Top 5

रुबिना दिलैकने साजरा केला वाढदिवस, पोस्ट केलेल्या फोटोत स्पष्ट दिसले बेबी बंप; चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 09:13 IST

रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला हे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कपल आहे.

टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैकने (Rubina Dilaik) नुकताच ३४ वा वाढदिवस साजरा केला. २६ ऑगस्ट रोजी तिने कुटुंबियांसोबत दिवस साजरा केला. मंदिरात पूजा करतानाचा आणि पती अभिनव सोबत वेळ घालवतानाचे फोटो तिने पोस्ट केले. यावेळी एका फोटोत तिचं बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. यावरुन रुबिना गरोदर असल्याच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत.

रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला हे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कपल आहे. 'बिग बॉस 14' मध्ये दोघंही सहभागी झाले होते. तेव्हा ते वेगळं होणार अशाही चर्चा होत्या. मात्र बिग बॉसच्या घरातच त्यांच्यात समेट झाली. रुबिना बिग बॉस विजेतीही झाली. यानंतर ही जोडी सोशल मीडियावर आणखी लोकप्रिय झाली. त्यांचा चाहतावर्ग वाढला. लग्नाच्या ४ वर्षांनंतर रुबिना गरोदर असल्याच्या चर्चा आहेत. अद्याप रुबिना किंवा अभिनवने स्वत: ही बातमी शेअर केलेली नाही. मात्र रुबिनाने नुकतंच शेअर केलेल्या एका फोटोत तिचे बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले, 'प्रत्येक गोष्टीसाठी आभार. माझे प्रेम अभिनव शुक्लाने हा दिवस दरवर्षीप्रमाणेच आणखी खास केला. मस्त सेलिब्रेशन, सरप्राईज आणि काय प्लॅनिंग केलंय.'

रुबिनाच्या पोस्ट चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होतोय. 'बेबी बंप सोडा पण चेहऱ्यावरचा ग्लो पाहूनही कळतंय की ती गरोदर आहे' अशी कमेंट एकाने केली आहे. 'असं वाटतंय की नवा पाहुणा लवकरच येतोय' अशीही कमेंट आली आहे. रुबिनाने २१ जून २०१८ मध्ये अभिनव शुक्लासोबत लग्नगाठ बांधली. आता दोघंही कधी आनंदाची बातमी जाहीर करताएत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारबिग बॉस १४प्रेग्नंसीसोशल मीडिया