प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री. कित्येकांची क्रश असलेली प्राजक्ता तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करते. प्राजक्ता सौंदर्यासोबतच तिच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देताना दिसते. फिट राहण्यासाठी प्राजक्ता उत्तम आहार तर घेतेच पण त्यासोबतच योगाभ्यासही करते. अनेकदा प्राजक्ता तिच्या सोशल मीडियावरुन व्यायाम करतानाचे व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना प्रोत्साहन देत असते.
फोटोमध्ये प्राजक्ता इतकी फिट कशी दिसते किंवा ती इतकी फिट कशी काय? याचं उत्तर म्हणजे प्राजक्ता रोज अष्टांग योग करते. ती न चुकता योगा करते. प्राजक्ता नियमित सूर्यनमस्कार करते. शीर्षासन, सर्वांगासन, चक्रासन अशी कठीण योगासनंही प्राजक्ता करताना दिसते. त्यासोबतच स्ट्रेचिंग आणि प्राणायमही प्राजक्ता रोज करते. यामुळेच प्राजक्ताला तिचा फिटनेस मेंटेन करणं शक्य होतं.
दरम्यान, प्राजक्ता केवळ एक अभिनेत्री नसून ती निर्माती आणि बिजनेस वुमनही आहे. तिने 'फुलवंती' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर तिचा दागिन्यांचा ब्रँडही आहे. याशिवास कर्जतमध्ये प्राजक्ताचं मोठं फार्महाऊसही आहे.