प्राजक्ता माळी ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. प्राजक्ता माळी सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोचं सूत्रसंचालन करत आहे. अशातच प्राजक्ताने सर्वांना एक वेगळी बातमी दिली आहे. त्यामुळे चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. प्राजक्ताने सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहून आयुष्यात घडलेला एक मोठा बदल चाहत्यांसोबत शेअर केला आहे.प्राजक्ता माळीने शेअर केली आनंदाची बातमी''गुरूकृपेने... आज अत्यंत आनंदाने सांगू इच्छितो/इच्छिते की, मी आता 'आर्ट ऑफ लिव्हिंग' कोर्सची (Art of Living) 'हॅपिनेस प्रोग्राम' शिक्षिका (Happiness Program Teacher) बनले आहे. गेले १५ दिवस मी शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्तरावर अत्यंत खडतर आणि सखोल प्रशिक्षण घेतले. फोनचा वापर नाही की बाहेरचे जेवण नाही; पूर्णपणे स्वतःच्या अंतर्मनात डोकावण्याचा हा काळ होता.''
''पद्मसाधना: दररोज पहाटे केलेली 'पद्मसाधना'... ज्यांनी अनुभवली आहे, त्यांनाच या साधनेचे महत्त्व ठाऊक आहे. या प्रवासात अशा अनेक गोष्टी अनुभवल्या ज्या शब्दांत मांडणे कठीण आहे. मी आता लवकरच स्वतःच्या वर्गांना सुरुवात करणार आहे, त्यामुळे संपर्कात राहा!'', अशा शब्दांत प्राजक्ताने ही खास बातमी सर्वांना दिली. एकूणच प्राजक्ताला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या हॅपिनेस प्रोग्रामची शिक्षिका होण्याचं सर्टिफिकेट मिळालंय. त्यामुळे ती खूप आनंदात आहे.
याच पोस्टमध्ये तिने ''तळटीप - अजिबात फिल्म इंडस्ट्री सोडून कुठेही जाणार नाहीये.'', असंही चाहत्यांना सांगितलंय. त्यामुळे शिक्षिका म्हणून प्राजक्ता आयुष्याची नवी सुरुवात करत असली तरीही ती सिनेसृष्टीत सक्रीय असणार आहे. प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोचं सूत्रसंचालन करत आहे. प्राजक्ताच्या आगामी सिनेमाबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही.
Web Summary : Actress Prajakta Mali announced she's now an Art of Living 'Happiness Program' teacher after intensive training. She reassured fans she's not leaving the film industry and will continue hosting 'Maharashtrachi Hasyajatra'.
Web Summary : अभिनेत्री प्राजक्ता माळी ने घोषणा की कि वह गहन प्रशिक्षण के बाद 'आर्ट ऑफ लिविंग' की 'हैप्पीनेस प्रोग्राम' शिक्षिका बन गई हैं। उन्होंने प्रशंसकों को आश्वासन दिया कि वह फिल्म उद्योग नहीं छोड़ रही हैं और 'महाराष्ट्रची हास्यजत्रा' की मेजबानी जारी रखेंगी।