Join us
Daily Top 2Weekly Top 5

"Bye Bye! पुढचे १५ दिवस मी..."; प्राजक्ता माळीच्या पोस्टची चर्चा; काय म्हणाली अभिनेत्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 11:45 IST

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ताला आपण विविध सिनेमा, मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय. प्राजक्ता माळी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या चांगलीच संपर्कात असते.

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ताला आपण विविध सिनेमा, मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय. प्राजक्ता माळी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या चांगलीच संपर्कात असते. विविध पेहरावातले फोटो पोस्ट करुन चाहतेही प्राजक्ताच्या फोटोंना भरभरुन दाद देतात. अशातच प्राजक्ता माळीच्या एका लेटेस्ट इन्स्टाग्राम पोस्टमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. काय म्हणाली प्राजक्ता?प्राजक्ता माळी ब्रेक घेणारप्राजक्ता माळीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. त्या व्हिडीओमध्ये प्राजक्ताने एक कॅप्शन लिहिलं आहे. ''बाय बाय फोन... पुढच्या १५ दिवसांसाठी'' असं कॅप्शन लिहून प्राजक्ताने ही माहिती सर्वांसोबत शेअर केलीये. प्राजक्ताने १५ दिवसांसाठी अचानक का ब्रेक घेतलाय, यामागचं कारणही तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये दडलंय. प्राजक्ता सध्या श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या आश्रमात गेलीये. तिथे जाऊन प्राजक्ता पुढील १५ दिवस अध्यात्मात तल्लीन होणार आहे. त्यामुळेच तिने १५ दिवस फोनपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ती सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोचं सूत्रसंचालन करत आहे. या शोमध्ये प्राजक्ता माळी तिच्या खुमासदार सूत्रसंचालनाने प्रेक्षकांचं मन जिंकते. याशिवाय ती हास्यजत्रेत स्कीट करणाऱ्या कलाकारांना कायमच प्रोत्साहन आणि दाद देताना दिसते. एकूणच प्राजक्ता माळी पुढचे १५ दिवस सोशल मीडियावर नसल्याने चाहते तिच्या व्हिडीओ - फोटोंना नक्कीच मिस करतील, यात शंका नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Prajakta Mali's social media detox: Actress takes 15-day break.

Web Summary : Actress Prajakta Mali is taking a 15-day break from social media to immerse herself in spirituality at the Art of Living ashram. She shared a video announcing her digital detox. Currently, she hosts 'Maharashtrachi Hasyajatra.'
टॅग्स :प्राजक्ता माळीटेलिव्हिजनटिव्ही कलाकारमराठी अभिनेतामराठी चित्रपट