Parag Tyagi Post: 'कांटा लगा' या गाण्यातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचं (Shefali Jariwala) २७ जूनच्या रात्री आकस्मिक निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला तिच्या जाण्याने सर्वांनाच धक्काच बसला. अभिनेत्रीच्या निधनानंतर तिचे कुटुंबीय अजूनही त्या दु: खातून सावरलेले नाहीत. त्याबरोबर तिचा पती पराग त्यागी (Parag Tyagi) तर पूर्णपणे खचला आहे. पराग सोशल मीडियावर शेफालीच्या आठवणीत पोस्ट लिहित आहे. त्यात नुकतीच त्याने बायकोच्या आठवणीत इन्स्टाग्रामवर काळीज पिळवटणारी पोस्ट शेअर केली आहे.
परागने त्याचा आणि शेफालीचे जुने क्षण व्हिडीओद्वारे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडीओ शेफाली आणि पराग त्यांचा क्वालिटी टाईम स्पेंड करत स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये परागने तोंडाला पावडर लावली असून शेफाली खळखळून हसते आहे. याशिवाय बॅकग्राउंडला त्याने काश फिर से पास तुझको बिठाऊं हे गाणं लावलं आहे. "मस्ती खोर मेरी गुंडी..., तू जिथे कुठे असशील तिथे अशीच मस्ती करत राहा...", असं भावुक कॅप्शन अभिनेत्याने या पोस्टला दिलं आहे.
परागच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्याला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. परी नेहमीच तुझ्यासोबत असेल... तसंच आणखी एका यूजरने म्हटलंय, एक माणूस म्हणून खूपच चांगली होती. पण,ती या जगात नाही यावर विश्वासच बसत नाहीये...". शेफाली जरीवालाने आपला अप्रतिम अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. २००२ मध्ये तिचे 'कांटा लगा' गाणे प्रसिद्ध झाले होते. या गाण्यातील तिच्या डान्सने, तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली. याशिवाय, तिने अनेक टीव्ही सीसियल्स आणि अनेक प्रोजेक्ट्समध्येही काम केले होते. यासाठीही तिचे बरेच कौतुक झाले.