Join us

"मी आनंदात नाही..." ढसाढसा रडली निक्की तांबोळी, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:35 IST

निक्कीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती ढसाढसा रडताना दिसून येत आहे.

 Nikki Tamboli: अभिनेत्री निक्की तांबोळी हे नाव कुणासाठीचं नवं नाही. निक्कीची सतत चर्चा होताना पाहायला मिळते. कधी ती बोल्ड फोटोंमुळे तर कधी लव्हलाईफ तर कधी आपल्या कामामुळं ती कायम चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. आता पुन्हा एकदा निक्कीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती ढसाढसा रडताना दिसून येत आहे. त्यामुळे निक्कीला नेमकं झालंय तरी काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

निक्की सोनी टिव्हीवरील 'सेलिब्रेटी मास्टरशेफ'मध्ये (Celebrity MasterChef) सहभागी झाली आहे. नुकतंच या कार्यक्रमाचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये  शेफ रणवीर ब्रार व फराह खान निक्कीशी बोलताना पाहायला मिळत आहे. त्यांच्याशी बोलताना निक्की भावूक होते. निक्की रडत रडत म्हणते,  "मागील तीन वर्षांत मी हिट रिअ‍ॅलिटी शो दिले आहेत. मी खूप मेहनत करतेय. पण तरीही मी आनंदी नाहीये. मी आनंद शोधतेय". निक्की का रडली, हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. पण, उत्तर चाहत्यांना एपिसोड प्रसारित झाल्यावरच कळेल.

से'लिब्रेटी मास्टरशेफ'मध्ये सहभागी होण्याआधी 'मराठी बिग बॉस सीझन ५' मध्ये सहभागी झाली होती. पहिल्या दिवसापासून तिनं 'बिग बॉस मराठी'चं घर डोक्यावर घेतलं होतं आणि शेवटपर्यंत ती खेळत होती. पण, ट्रॉफी जिंकू शकली नाही. यात ती टॉप ३ मध्ये पोहचली होती. आता मास्टरशेफचा प्रतिष्ठित किताब जिंकणार का? हे कळेलच. 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर 27 जानेवारीपासून आणि दर सोमवार ते शुक्रवार प्रसारित करण्यात येणार आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनटिव्ही कलाकारसोशल मीडिया