Join us

अखेर माय-लेकींची होणार भेट; कार्तिक दीपिकाला सांगणार दीपाचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 16:13 IST

Rang maza vegla: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये  दीपिका, कार्तिकला तिच्या आईविषयी प्रश्न विचारते.

स्टार प्रवाहवरील 'रंग माझा वेगळा' (rang maza wegla) या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहे. कार्तिक आणि दीपा त्यांच्या लेकींसमोर असूनही ते एकमेकांसोबत असलेलं नातं उघड करु शकत नाही. त्यामुळे दीपिका आणि कार्तिकी अजूनही त्यांच्या खऱ्या आई-बाबांचा शोध घेत आहेत. मात्र, आता ही मालिका रंजक वळणार येऊन ठेपणार आहे. कारण, दीपाच तुझी खरी आई आहे असं कार्तिक दीपिकाला सांगणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये  दीपिका, कार्तिकला तिच्या आईविषयी प्रश्न विचारते. अखेर न रहावून कार्तिक तिला सत्य सांगतो. यावेळी तो तिच्यासमोर एक फोटोदेखील धरतो. त्यामुळे दीपिका थक्क होते.

दरम्यान, कार्तिक, दीपिकाला सत्य सांगत असतानाच दीपा त्यावेळी तिथे येते. आणि, दीपिका पटकन तिला आई म्हणते. परंतु, कार्तिकने दाखवलेला फोटो खरंच दीपाचा आहे की अन्य कोणाचा हे मात्र गुलदस्त्यात आहे. मात्र, दीपिकाला दीपाचं सत्य समजलं तर तिची काय प्रतिक्रिया असेल? पुढे या मालिकेत काय होणार असे बरेच प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. मात्र, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारस्टार प्रवाहरेश्मा शिंदे