Join us
Daily Top 2Weekly Top 5

"निदान कॅमेऱ्यासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करा"; नेटकऱ्याची कमेंट, ऐश्वर्या नारकर म्हणाल्या- "तुमचा फोकस..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 12:27 IST

नुकतंच ऐश्वर्या यांनी योगसाधनेचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने विचित्र कमेंट केली. त्यावर ऐश्वर्या यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे.

ऐश्वर्या नारकर या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. ऐश्वर्या यांना आपण विविध मालिका, सिनेमा आणि नाटकांमधून अभिनय करताना पाहिलंय. ऐश्वर्या आणि त्यांचे पती अविनाश नारकर यांचे रिल व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. त्यांना अनेकदा ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. नुकतंच ऐश्वर्या यांनी योगसाधनेचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने विचित्र कमेंट केली. त्यावर ऐश्वर्या यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे.ऐश्वर्या नारकर यांनी दिलं सणसणीत उत्तर

ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर योगचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओवर नेटकऱ्याने कमेंट केली, ''निदान कॅमेरासमोर तरी फूल कपडे घालून योगा करत जा मॅडम'', नेटकऱ्याची ही कमेंट ऐश्वर्या यांनी शेअर केली. त्यांनी त्याला उत्तर दिलं की, ''बुरसटलेले विचार सोडा, तुमचा फोकस का हलतोय?''. यावर त्या नेटकऱ्याने ऐश्वर्या यांना पर्सनल मेसेज करुन सांगितलं की, ''याला तुम्ही बुरसटलेले विचार म्हणत असाल तर तुमच्या अकलेची कीव करावीशी वाटते, व्हिडीओला views वाढवण्यासाठी असे कपडे घालून व्हिडीओ बनवता?''

यावर ऐश्वर्या यांनी उत्तर दिलं की, ''मुद्दा वयोमानाचा आहे. कोणी काय कपडे घालावेत हा व्यक्तीगत प्रश्न आहे. तुमच्या स्टेटमेंटवरुन अक्कल कळतेच आहे.'' नंतरही तो नेटकरी गप्प बसला नाही. तो म्हणाला, ''कोणते कपडे घालायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तुमच्या अशा कपड्यांमुळे लहान मुलं बिघडतात त्याचं काय करायचं?''. यावर ऐश्वर्या यांनी उत्तर देऊन त्याची बोलतीच बंद केली. त्या म्हणाल्या, ''त्यांना व्यायाम करायला शिकवा. म्हणजे विचारांचा समतोल येईल आणि डोकं शाबुत राहिल. नाहीतर तुमच्यासारखंच होणार मोठे होऊन.''

अशाप्रकारे ऐश्वर्या नारकर यांनी त्या नेटकऱ्याची चांगलीच बोलती बंद केली. ऐश्वर्या आणि अविनाश यांना त्यांच्या डान्स व्हिडीओमुळेही ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. तरीही सर्वांचा विरोध झुगारुन ऐश्वर्या बिनधास्तपणे त्यांचे व्हिडीओ शेअर करत असतात. म्हणून नेटकरीही त्यांच्या सडेतोड आणि रोखठोक स्वभावाचं कौतुक करताना दिसतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Aishwarya Narkar trolled for yoga attire; actress gives sharp reply.

Web Summary : Aishwarya Narkar faced criticism for her yoga video attire. A netizen's comment sparked a strong response from the actress, who questioned the commenter's narrow-minded focus and defended personal choice in clothing while advocating for mental balance through exercise.
टॅग्स :ऐश्वर्या नारकरअविनाश नारकरसोशल मीडियाइन्स्टाग्राममराठी अभिनेतासेलिब्रिटीटिव्ही कलाकार