Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉसची ट्रॉफी हिलाच द्या'; मीराच्या 'त्या' आरोपांवर संतापला विशाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 18:07 IST

Bigg boss marathi 3: मीरा आणि विशाल यांच्यात वाद होणार आहेत. मीराने केलेल्या आरोपांमुळे विशाल तिच्यावर संतापणार आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो म्हणून 'बिग बॉस मराठी' (bigg boss marathi) या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. हा शो घरात रंगणाऱ्या टास्कपेक्षा स्पर्धकांमध्ये होणाऱ्या वादविवादांमुळे जास्त चर्चेत येतो. सध्या या शोचं तिसरं पर्व सुरु असून शेवटचे ७ स्पर्धक राहिले आहेत. परंतु, या सातही स्पर्धकांमध्ये दररोज नवनवीन विषयांवरुन वाद होताना पाहायला मिळतात. त्यातच आता मीरा आणि विशाल यांच्यात वाद होणार आहेत. मीराने केलेल्या आरोपांमुळे विशाल तिच्यावर संतापणार आहे.

कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये मीरा विशालवर काही आरोप करताना दिसत आहे. प्रेम प्रकरणाशिवाय बिग बॉसचं घर अपूरं आहे, असं विशाल म्हणाल्याचं मीरा सांगते. तिच्या या वाक्यावरुन विशाल तिच्यावर संतापणार आहे.

''बिग बॉस'चं घर प्रेम प्रकरणाशिवाय अपूर्ण आहे, असं तुला कोण म्हणालंय मीरा?", असा प्रश्न महेश मांजरेकर विचारतात.त्यावर विशाल म्हणाला, असं मीरा म्हणते. तिच्या या वाक्यानंतर महेश मांजरेकरांसह सगळेच आश्चर्यचकित झाले. यावर 'हो. विशाल म्हणाला होता. बिग बॉसचा शो सुरु झाल्यावर पहिल्याच आठवड्यात तो म्हणाला होता," असं मीरा सांगते. 

मीराचं हे वाक्य ऐकल्यावर, "आई शप्पथ सांगतो सर असं फालतुगिरी मी काही बोललो नाही. त्या गोष्टीवरुन एवढं महाभारत झालंय तरी त्याच विषयावरुन बोलतेस", असं विशाल म्हणाला. त्यावर, "सर, मी खोटं बोलणार नाही. विशाल खरंच म्हणाला होता". त्यानंतर मीराचं हे वाक्य खोडून काढत, "सर, हिला दोन दिवसांपूर्वी बोललेलं लक्षात राहत नाही, ही पहिल्या आठवड्याचं सांगतीये. एक काम करा सर हिलाच विनिंग ट्रॉफी देऊन टाका."

दरम्यान, मीराच्या या वाक्यानंतर पुन्हा एकदा विशाल आणि तिच्यात वादाची ठिणगी पडली आहे.  आता या दोघांचा वाद कुठपर्यंत जाईल हे आजच्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे. तसंच ग्रँड फिनालेमध्ये पोहोचणारा पहिला फॅनलिस्ट विशाल ठरला आहे. तर दुसरीकडे सोनाली पाटीलचा या घरातील प्रवास आज संपणार आहे.  

टॅग्स :बिग बॉस मराठीटेलिव्हिजनटिव्ही कलाकारमहेश मांजरेकर