Join us

काय फालतुगिरी! कुटुंबासोबत कसं पाहायचं?, अक्षरा-अधिपतीमधील रोमँटिक सीन्स पाहून प्रेक्षक भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 11:47 IST

कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी निराशा व्यक्त केली आहे.

झी मराठीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेचे प्रेक्षक चाहते आहेत. यातील अधिपतीचा अभिनय तर सगळ्यांनाच भावला. तसंच मास्तरीण बाई आणि अधिपतीची केमिस्ट्रीही आवडली. सध्या मालिकेत हनिमून ट्रॅक सुरु आहे. अक्षरा आणि अधिपती थायलंडमध्ये असून तिथे त्यांच्यात रोमँटिक सीन्स शूट करण्यात आले आहेत. मात्र हे सीन्स पाहून नेटकरी भडकले आहेत. कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी निराशा व्यक्त केली आहे.

लाल ड्रेस, मोकळे केस या लूकमध्ये अक्षरा बोल्ड दिसत आहे. तर अधिपती पांढऱ्या कुर्ता घालून आहे. रुममध्ये हनिमून कपलसाठी सजवलेला बेड, गॅलरी तर कधी स्वीमिंग पूलमध्ये त्यांच्यात रोमँटिक सीन्स शूट करण्यात आले आहेत. थायलंडमध्ये दोघंही एकदम बोल्ड झाले आहेत. हे पाहून ही कौटुंबिक मालिका आहे का असा जाब आता प्रेक्षक विचारत आहेत. 

अक्षरा-अधिपतीच्या या रोमँटिक ट्रॅकवर प्रेक्षकांनी कमेंट केल्या आहेत. 'मराठी सीरियल कोठे जात आहे, फॅमिलीसोबत कसं पाहायचं आणि काय घेण्यासारखे आहे','हे दाखवायची गरज आहे का? काय फालतुगिरी','एवडं पण क्लोज नव्हतं दाखवायला पाहिजे','इमरान हाश्मीचा पिक्चर आहे का?' असं म्हणत प्रेक्षकांनी राग व्यक्त केला आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजनट्रोलसोशल मीडिया