Join us

आशुतोष-अरुंधतीच्या प्रेमाला फुटली पालवी; देशमुख कुटुंबासमोर आशुतोष देणार प्रेमाची कबुली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 13:00 IST

Aai kuthe kay karte: आशुतोष आणि अरुंंधती यांच्यातील मैत्री खुलत असून तो देशमुख कुटुंबासमोर त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे.

छोट्या पडद्यावरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte). ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वीच अनिरुद्ध आणि आईंनी अरुंधतीच्या चारित्र्यावर संशय घेतला. ज्यामुळे दुखावलेल्या अरुंधतीने देशमुखांचं घर कायमचं सोडलं आहे. सध्या अरुंधती आणि यश देशमुखांचं घर सोडून डोबिंवलीमध्ये राहायला आले आहेत. यावेळी अरुंधतीच्या पाठिशी तिचा भाऊ, आई आणि आशुतोषही खंबीरपणे उभे आहेत. यामध्येच आता आशुतोष आणि तिच्यातील मैत्री खुलत असून तो देशमुख कुटुंबासमोर त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे.

एका पोर्टलने शेअर केलेल्या पोस्टनुसार, आशुतोष संपूर्ण देशमुख कुटुंबासमोर त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे. तो अरुंधतीवर प्रेम करतो हे जाहीरपणे सांगणार आहे. परंतु, आशुतोषने त्याचं प्रेम व्यक्त केल्यानंतर अरुंधती आणि घरातल्यांची काय प्रतिक्रिया असेल हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, या सगळ्या प्रकारामुळे आता या मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार असल्याचं समजत आहे.

दरम्यान, अनिरुद्धने घटस्फोट दिल्यानंतर अरुंधती तिच्या स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी धडपड करत होती. तिच्या या प्रवासात तिला तिचा कॉलजेचा मित्र आशुतोष भेटतो आणि तिच्या स्वप्नांना बळ मिळतं. आशुतोष, अरुंधतीला त्याचं एक गाणं गायची ऑफर देतो. अलिकडेच अरुंधतीच्या आवाजातलं गाणं रिलीज झालं असून या गाण्याला तुफान लोकप्रियता मिळत आहे. त्यामुळेच अनिरुद्ध अस्वस्थ झाल्याचं दिसून येत आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकारमधुराणी प्रभुलकरमिलिंद गवळी