Join us

'चला हवा येऊ द्या'फेम निलेश साबळेसोबतची 'ही' चिमुकली कोण माहितीये का? आज आहे लोकप्रिय अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 17:15 IST

Tv actress: सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. यात अनेकदा ते त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करुन आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत असतात.

सध्याच्या काळात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. यात अनेकदा ते त्यांच्या बालपणीचे किंवा कॉलेज जीवनातील फोटो शेअर करुन आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीचा एक लहानपणीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ही अभिनेत्री अभिनेता निलेश साबळे  (nilesh sable) याच्यासोबत दिसून येत आहे.

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे निलेश साबळे. सध्या या लोकप्रिय अभिनेत्यासोबत एका अभिनेत्रीने तिचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती शालेय वयात असल्याचं दिसून येत आहे.

सध्या सोशल मीडियावर या दोन्ही कलाकारांचा फोटो व्हायरल होत असून ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली गौरी कुलकर्णी आहे. गौरी लहान असताना तिने 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर हजेरी लावली होती. त्यावेळी हा फोटो काढल्याचं सांगण्यात येतं. 'ऑलमोस्ट सुफल संपूर्ण' या मालिकेत झळकलेली गौरी सध्या 'अबोली' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसिनेमा