Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आकाराने छोटा असला तरी..."; "लाखात एक..." फेम अभिनेत्याने महेश जाधवच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 15:48 IST

'लाखात एक आमचा दादा' या मालिकेत अभिनेता महेश जाधव 'काजू' नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. दरम्यान, त्याच्या वाढदिवसानिमित्त नितीश चव्हाणने खास पोस्ट केली आहे.

Nitish Chavan: झी मराठीवरील 'लाखात एक आमचा दादा' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. भावा बहिणीच्या नात्यावर आधारित असलेली ही मालिका प्रेक्षकांना आवडते आहे. एक लक्षवेधी बाब म्हणजे 'लाखात एक आमचा दादा'मध्ये कलाकारांची फौज पाहायला मिळतेय. या मालिकेत 'लागिरं झालं जी' फेम अभिनेता नितीश चव्हाण (Nitish Chavan) सूर्याच्या भूमिकेत दिसतोय. तर अभिनेत्री दिशा परदेशी तुळजाची भूमिका साकारत आहे. मालिकेत महेश जाधव देखील आहे. महेशने 'लागिरं झालं' मालिकेत नितीशसोबत स्क्रीन शेअर केली होती. आता पुन्हा ते दोघे एकत्र काम करत आहेत. दरम्यान, महेश जाधवच्या वाढदिवसानिमित्त नितीशने सोशल मीडियावर खास अंदाजात त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

नितीश चव्हाणनेसोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.  या व्हिडीओला कॅप्शन देत अभिनेत्याने लिहलंय, "सतत डे नाईट काम करणारे “महेश जाधव" यांना वाढदिवसाच्या आणि रात्रीच्या पण शुभेच्छा! महेश खूप मोठा हो, "टॅलेंट" साकारून तू तुझं टॅलेंट दाखवलं आहेसच आणि आता "काजू" आकाराने छोटा असला तरी त्याचा भाव किती जास्त आहे. हे तू साऱ्या जगाला दाखवून दिलंस मित्रा, असाच तुझा भाव वर्षोनुवर्षे वाढत जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. लव्ह यू". 

महेश जाधव छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने वेगवेगळ्या मराठी मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'लागिरं झालं जी', 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामध्येही तो झळकला. 

टॅग्स :नितीश चव्हाणटिव्ही कलाकारसोशल मीडिया