Join us
Daily Top 2Weekly Top 5

"शेवटी काय ती खूश तर...", 'बिग बॉस' फेम विकास पाटीलने लग्नाच्या वाढदिवशी बायकोला दिलं 'हे' खास सरप्राइज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 16:47 IST

लग्नाच्या वाढदिवशी विकास पाटीलने सपत्नीक घेतलं जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन म्हणतो-"शेवटी काय ती खूश तर..."

Vikas Patil : विकास पाटील (Vikas Patil) हा मराठी मनोरंज विश्वातील लोकप्रिय अभिनेत्यापैंकी एक आहे. चित्रपट, मालिका तसेच नाटकांच्या माध्यमातून अभिनेता विकास पाटील घराघरात पोहोचला. शिवाय 'बिग बॉस' मराठी'च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या पर्वातही तो सहभागी झाला होता. त्यानंतर अभिनेत्याच्या लोकप्रियतेत कमालीची  वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, अभिनेत्याने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने चाहत्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

विकास पाटीलने त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाचं औचित्य साधून लाडक्या  बायकोला सुंदर असं सरप्राइज दिलं आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने अभिनेत्याने त्याच्या बायकोची खास इच्छा पूर्ण केली आहे. अ‍ॅनिव्हर्सरीच्या दिवशी आपल्या बायकोला घेऊन जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला गेला आहे. स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर विकासने बायकोसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहलंय, "तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको. माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे तू उभी राहिलीस त्याबद्दल तुझे मनापासून आभार!" 

पुढे अभिनेत्याने लिहलंय की, "तिची इच्छा होती आज जेजुरीला जाऊन खंडेरायचं दर्शन घ्यायचं.मग काय, आज तिची इच्छा शीरसंवाद्य सुंदर दर्शन झालं. उद्या चंपाशष्ठी असल्याने खूप सुंदर वातावरण होतं शेवटी काय ती खूश तर आपण खूश. यळकोट यळकोट जय मल्हार!"  विकासने शेअर केलेल्या पोस्टवर त्याच्या चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही प्रतिक्रिया केल्या आहेत. अभिनेत्री सोनाली पाटीलने विकास पाटीलच्या फोटोंवर "Akkaachaaa shabdd..." अशी कमेंट केली आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारसोशल मीडिया