Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुझे सब हैं पता, हैं ना माँ...' अभिनेता आस्ताद काळेची आईच्या वाढदिवसानिमित्त भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 13:51 IST

अभिनेता आस्ताद काळे हा मराठी कलाविश्वातील नावाजलेला नट आहे.

Aastad kale Viral Post : अभिनेता आस्ताद काळे हा मराठी कलाविश्वातील नावाजलेला नट आहे. नाटक, मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम करत त्याने आपली ओळख निर्माण केली आहे. निरनिराळ्या व्यक्तिरेखा साकारत त्याने प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची दखल घ्यायला लावली. अभिनयाबरोबरच आस्ताद त्याच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत येत असतो. नुकतीच त्याने इन्स्टाग्रामवर आईच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. या व्हायरल पोस्टमुळे अभिनेता चर्चेत आहे. 

आस्तादने त्याच्या आईसोबतच एक गोड फोटो पोस्ट केलाय. या फोटोसोबत त्यानं 'तुझे सब हैं पता, हैं ना मॉं' हे स्टोरी सॉंग लावलं आहे. शिवाय त्याने कॅप्शनमध्ये लिहलं की, "MAMA.... Happy Birthday....., या गाण्यात जे काही आहे, ते सगळं भूतकाळात म्हणावं लागतंय, याचं दु:ख आहेच... पण ते वर्तमान आणि भविष्यातही लागू होणार आहे गं...". 

गतवर्षी आस्तादची आई सुनीता काळे यांनी जगाचा निरोप घेतला. आस्ताद आणि त्याच्या आईचं नातं फार खास होतं. अनेकदा आस्ताद आईबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसायचा. आता आईच्या आठवणीत आस्ताद भावुक झाला आहे.  त्याच्या पोस्टने चाहतेही हळहळले आहेत.

टॅग्स :अस्ताद काळेटेलिव्हिजनमराठी अभिनेतासेलिब्रिटीसोशल मीडिया