Jui Gadkari: छोट्या पडद्यावरची लाडकी सून म्हणून जुई गडकरीला (Jui Gadkari) ओळखलं जातं. 'पुढचं पाऊल' या मालिकेतून अभिनेत्रीला खरी ओळख मिळाली. सध्या ती स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेतील सायलीच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तिच्या या पात्राला चाहत्यांची पसंती मिळत आहे. अशातच जुईने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामुळे अभिनेत्री चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय. होळीच्या निमित्ताने तिने सुंदर व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
जुई गडकरीसोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असते. आपल्या अभिनयासह आगामी प्रोजेक्ट्स तसेच फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करते. नुकताच अभिनेत्रीने कोकणातील पारंपरिक गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये जुई गोमु तुझे केस लांब या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. गोमु नाच! शिमगा स्पेशल... असं कॅप्शन देत तिने हा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तसंच जुईचं कौतुक सुद्धा केलं आहे.
दरम्यान, जुई गडकरीच्या व्हिडीओवर अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी कमेंट करत लिहिलंय, "अगं..., त्यासोबत लाफ्टर इमोजी शेअर केलेत. त्याचबरोबर ठरलं तर मालिकेतील जुईची सहकलाकार केतकी विलासने देखील "व्वा, व्वा जुई प्रगती आहे...", अशी प्रतिक्रिया दिली आहे.