Join us

"तुझ्या शारिरीक वेदना..." आईच्या निधनानंतर सुप्रिया पाठारे यांची भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 16:55 IST

आईच्या निधनानंतर त्या धक्क्यातून सावरलेल्या नाहीत.

मराठी अभिनेत्री सुप्रिया पाठारे (Supriya Pathare) यांच्या आईचं चार दिवसांपूर्वी निधन झालं. ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या कलाकारांसोबत आईचा फोटो पोस्ट करत त्यांनी भावूक कॅप्शन लिहिले आहे. आईच्या निधनानंतर त्या अजूनही धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. सुप्रिया या त्यांच्या आईच्या खूप जवळ होत्या. त्यांची भावंडं लहान असताना आई पैसे कमावण्यासाठी रस्त्यावर अंडी, चणे विकण्याचं काम करायची. नंतर सुप्रिया स्वत:ही आईला हातभार लावायच्या. त्यांच्या आईचं निधन हे सर्वांसाठीच धक्कादायक होतं.

'ठिपक्यांची रांगोळी' या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांची भूमिका होती. दरम्यान चार दिवसांपूर्वी त्यांच्या आईच्या निधनाची बातमी आली. सुप्रिया यांची आतेबहीण अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांनीही मामी गेली असं म्हणत श्रद्धांजली वाहिली. तर आता सुप्रिया पाठारे यांनी फोटो शेअर करत लिहिलं,"आज आई ला जाऊन 4 दिवस झाले, मे महिन्यात ठिपक्यांची रांगोळी मधले माझ्या सह कलाकारांना घेऊन गावी गेले होते ,खूप खुश झाली,गणपतीला माझ्या घरी 2 दिवस राहिली सगळ्यांना भेटली ,ही बातमी सगळ्यांना च धक्का देणारी होती ,त्या धक्क्यातून मीच अजून सावरले नाही,आई तुझ्या शारीरिक वेदना मी समझु शकते,जिथे आहेस तिथे सुखात राहा."

सुप्रिया पाठारे यांच्या आईने मोठ्या कष्टाने मुलांना वाढवलं. नंतर सुप्रिया अभिनय क्षेत्रात आल्या आणि त्यांचं आयुष्य बदललं. सुप्रिया यांनी विनोदी शो, मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

टॅग्स :मराठी अभिनेतापरिवारमृत्यूसोशल मीडिया