Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रार्थना बेहरेच्या एक्स्प्रेशन्ससमोर करीना कपूरही झाली फेल; पाहा बेबोच्या गाण्यावरील प्रार्थनाचा खास Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 18:40 IST

Prarthana behere: अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर प्रार्थनाने 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर प्रार्थनाने 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. विशेष म्हणजे ही मालिका पहिल्या भागापासून लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील यश आणि नेहा यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना कमालीची आवडली आहे. त्यामुळे या भूमिका साकारणाऱ्या श्रेयस तळपदे व प्रार्थना बेहरे या दोन्ही कलाकारांच्या लोकप्रियतेतही वाढ झाली आहे. विशेष म्हणजे याच चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी प्रार्थना सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

अभिनेत्री प्रार्थना बेहरे कलाविश्वप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. यात अनेकदा ती त्या फोटोशूटचे किंवा सेटवरील फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने शेअर केलेला व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

प्रार्थनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती सोनू निगमच्या 'दिवाना हैं देखो' या गाण्यावर एक्स्प्रेशन्स देताना दिसत आहे. या मूळ गाण्यात अभिनेत्री करीना कपूर खान आणि हृतिक रोशन झळकले आहेत. परंतु, यावेळी प्रार्थनाने या गाण्यावर दिलेले एक्स्प्रेशन्स नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. 

टॅग्स :करिना कपूरसिनेमाटेलिव्हिजनटिव्ही कलाकार