Join us

"त्यांनी मला बिकीनी घालायला सांगितली अन्...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 15:18 IST

"बिकीनीमुळे मोठी संधी नाकारली, कारण...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतील वास्तव 

Nayana Aapte: मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्री नयना आपटे (Nayana Aapte) यांचं नाव कलाविश्वात मोठ्या आदराने घेतलं जातं.  'लग्नाची बेडी', 'देव देव्हाऱ्यात नाही', 'एकच प्याला', 'करायला गेलो एक' अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांत त्यांनी काम केलं आहे. मनोरंजन विश्वातील या जेष्ठ दिग्गज अभिनेत्रीने केवळ चित्रपटच नाही तर, नाटक आणि मालिका विश्व देखील गाजवलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी बॉलिवूड चित्रपटात काम करण्यासंबंधित एक किस्सा शेअर केला आहे. 

नयना आपटे यांनी 'इट्स मज्जा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रामानंद सागर यांच्या 'चरस' चित्रपटादरम्यानचा किस्सा शेअर केला. या चित्रपटात हेमा मालिनी आणि धर्मेंद्र मुख्य भूमिकेत होते. तो चित्रपट आपण केवळ एका बिकीनीसीनमुळे असं त्यांनी सांगितलं. त्याबद्दल बोलताना नयना आपटे म्हणाल्या,  "त्यावेळी रामानंद सागर म्हणाले, तुला बिकीनी घालावी लागेल आणि त्यामध्ये भूमिका चांगली आहे. त्यावर मी त्यांना म्हटलं की, सागर साहेब मला त्याच्यामध्ये विचित्र वाटेल. त्या ड्रेसमध्ये मला अवघडल्यासारखं वाटेल. तुम्ही मला एक स्विमसूट द्या तो मी घालेन. अशा कपड्यांमध्ये मी काम करु शकत नाही. मला जर चांगलं काम करायचं असेल तर त्यासाठी मला त्याप्रमाणे कपडे तुम्ही द्या."

त्यानंतर रामानंद सागर मला म्हणाले, "बिकिनी ही भूमिकेची गरज आहे. तर मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, माफ करा हे होणार नाही. तू असं करणार तर इंडस्ट्रीमध्ये तुला काम कोण देणार? असंही ते मला म्हणाले. त्यावर उत्तर देताना मी म्हटलं, असं जर असेल तर मला काम नाही करायचं. मला चांगलं काम करुन पुढे जायचं आहे." असा खुलासा त्यांनी केला. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा