Join us

लग्नानंतर प्रसादचा वर्क मोड ऑन; लवकरच झळकणार 'या' गाजलेल्या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 13:31 IST

Prasad jawade: प्रसाद जवादे नव्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला; गाजलेल्या मालिकेत करणार काम

बिग बॉस मराठीच्या (Bigg boss marathi) माध्यमातून विशेष चर्चेत आलेला अभिनेता म्हणजे प्रसाद जवादे (Prasad jawade). १८ नोव्हेंबर रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रसादने अभिनेत्री अमृता देशमुखसोबत लग्न केलं. त्यामुळे सध्या ही जोडी त्यांच्या नवीन संसारामुळे चर्चेत येत आहे. परंतु, लग्नाला काही दिवस पूर्ण झाल्यानंतर या सेलिब्रिटी जोडीने त्यांच्या करिअरवर फोकस केलं आहे. प्रसाद लवकरच एका गाजलेल्या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लग्नानंतर प्रसाद आणि अमृता दोघेही आपआपल्या कामांकडे वळले आहेत. अमृता सध्या तिच्या नियम व अटी लागू या गाजलेल्या नाटकासाठीचे दौरे करत आहे. तर, प्रसाद सुद्धा त्याच्या मालिकांकडे वळला आहे. प्रसाद लवकरच सन मराठीवरील एका गाजलेल्या मालिकेत झळकणार आहे.

कलर्स मराठीवरील 'काव्यांजली' या मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर प्रसाद सन मराठीवरील 'सावली होईन सुखाची' या मालिकेत झळकणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये प्रसाद महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, प्रसादने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. याच 'अरुंधती', 'कुलस्वामिनी', 'असे हे कन्यादान' या मालिकांमध्ये तो झळकला आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारअमृता देशमुखमराठी अभिनेता