Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मालवणी माणसाचं झेंडो फडकव..'; पॅडी कांबळेंच्या मित्राचं बाप्पासमोर गाऱ्हाणं, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 14:44 IST

पॅडी कांबळेच्या मित्राने बाप्पासमोर गाऱ्हाणं गाऊन मनोकामना पूर्ण केलीय (padddy kamble, bigg boss marathi 5)

बिग बॉस मराठीच्या घरात या सीझनमध्ये एकापेक्षा एक स्पर्धकांची चांगलीच चर्चा आहे. यापैकी एक स्पर्धक म्हणजे पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे. पॅडी गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत असल्याने त्याची प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. पॅडीची सध्या बिग बॉस मराठीमध्ये चांगलीच चर्चा आहे. पॅडीचा खेळ उत्कृष्ट आहेच शिवाय तो संभाषणचातुर्यानेही बिग बॉसच्या घरात स्वतःची छाप पाडतोय. अशातच पॅडीचे कलाकार मित्र प्रकाश कवळेंनी त्याच्यासाठी बाप्पाकडे गाऱ्हाणं गायलं आहे.

पॅडीसाठी मित्राचं बाप्पाकडे गाऱ्हाणं

"हे देवा गणपती बाप्पा महाराजा.. तुझो लाडको भक्त आणि आमचो लाडको कलाकार पॅडी कांबळे बिग बॉसच्या घरात गेलो आहेत रे महाराजा.. त्याका आता चांगला सूर लागलेला असा.. तो सुर त्याका ट्रॉफी मिळेस्तोवर असाच राहू दे रे महाराजा.. चांगले खेळणाऱ्याक चांगला आशीर्वाद दे.. वाईट खेळणाऱ्याक सद्बुद्धी दे रे महाराजा.. आणि वाईट बुद्धीच्या माणसाक बाहेरचा रस्ता दाखव रे महाराजा.. पॅडी कांबळेकडून मालवणी माणसाचो झेंडो फडकू दे रे महाराजा... एकाचे एक कर.. पाचाचे पंचवीस कर.. आणि आमच्या पॅडी कांबळेक जिंकून आण रे महाराजा.." असं खास गाऱ्हाणं पॅडीचे कलाकार मित्र प्रकाश कवळेंनी बाप्पासमोर मांडलं आहे.

पॅडीच्या खेळाची चांगलीच चर्चा

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये सहभागी झालेला पॅडी कांबळे हा प्रेक्षकांचा लाडका अभिनेता. बिग बॉस मराठीमध्ये जाण्याच्या आधी आपण पॅडीला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', 'गंगूबाई नॉनमॅट्रिक' अशा मालिकांमध्ये प्रेक्षकांंचं मनोरंजन करताना पाहिलंय. पॅडी खूप आधीपासून अभिनयक्षेत्रात सक्रिय आहे. पॅडीची भूमिका असलेला 'हसा चकटफू' हा शो चांगलाच गाजला. यात पॅडी आणि भरत जाधव या जोडीला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं.

टॅग्स :भातबिग बॉस मराठीटेलिव्हिजन