Akshay Kelkar: 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकर (Akshay Kelkar) कायम चर्चेत असतो. आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे किंवा व्यावसायिक आयुष्यामुळे तो अनेकदा चर्चेत येतो. अलिकडेच अक्षयने त्याच्या गर्लफ्रेंडविषयी खुलासा केला होता. अभिनेत्याने सोशल मीडियावर आपल्या नात्याची जाहीर कबुली देत त्याच्या खऱ्या आयुष्यातील रमाबद्दल सांगितलं होतं. त्यानंतर आता अक्षय केळकरने त्याच्या लग्नाबद्दल थेट चाहत्यांना संकेत दिले आहेत.
अक्षय केळकरने नुकतीच्या त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत त्याचे आणि रमाचे अनसीन फोटो शेअर केले आहेत. या पोस्टसोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "May 2025 it is ! आता ना फिरणे माघारी, वाजवा हो तुतारी, करा ही तयारी... तरीही मुलींनो, I love you मी फक्त तुमचाच आहे!", अशी पोस्ट त्याने शेअर केली. दरम्यान, अभिनेत्याची ही पोस्ट पाहून चाहते त्याच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत.
कोण आहे अक्षयची रमा?
अक्षय केळकर 'बिग बॉस'मध्ये असताना तो सतत त्याच्या गर्लफ्रेंडचं रमाचं नाव घ्यायचा. मात्र त्याने कधीच तिचा चेहरा दाखवला नव्हता. आता अलिकडेच त्याने त्याच्या लाडक्या रमाला जगासमोर आणलं. अक्षय केळकरच्या 'रमा'चं खरं नाव साधना काकतकर असं आहे. गीतकार, गायिका साधना काकतकर ही त्याची खरी रमा आहे. दहा वर्षांपासून दोघंही रिलेशनशिपमध्ये आहेत.