Join us
Daily Top 2Weekly Top 5

खऱ्या आयुष्यात इंद्राला मिळाली दिपू?; अजिंक्य राऊत आहे 'तिच्या' प्रेमात, नुकताच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 13:27 IST

Ajinkya raut: अजिंक्यने अलिकडेच आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतलं. यावेळी एका चाहत्याने थेट त्याला गर्लफ्रेंडविषयी प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देत त्याने त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव सांगितलं.

'मन उडू उडू झालं' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे अजिंक्य राऊत. 'विठू माऊली'सारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेला अजिंक्य लवकरच 'कन्नी' या आगामी सिनेमामध्ये झळकणार आहे. त्यामुळे सध्या तो चर्चेत आहे. यामध्येच अजिंक्यने चाहत्यांशी थेट संवाद साधण्यासाठी इन्स्टाग्रामवर आस्क मी सेशन घेतलं. यावेळी एका चाहत्याने त्याला सरळ त्याच्या गर्लफ्रेंडविषयी प्रश्न विचारला.  विशेष म्हणजे अजिंक्यने सुद्धा त्याची गर्लफ्रेंड कोण? याचं उत्तर दिलं.

अजिंक्यने घेतलेल्या 'आस्क मी एनिथिंग' या सेशनमध्ये चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. यात काही प्रोफेशनल लाइफशी निगडीत होते. तर, काही पर्सनल आयुष्याशी संबंधित. परंतु, अजिंक्यने शक्य होईल त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. यात एका चाहत्याने थेट तुझी सध्याची क्रश किंवा गर्लफ्रेंड कोण आहे? असा प्रश्न विचारला. त्यावर अजिंक्यनेही भन्नाट उत्तर दिलं.

दरम्यान, तुझी गर्लफ्रेंड कोण? असं विचारल्यानंतर त्याने, '“माझी नवीन गाडी. पुन्हा एकदा आयुष्यात आनंदात आहोत” ', असं उत्तर दिलं. अजिंक्यने काही दिवसांपूर्वीच नवीन गाडी घेतली. या गाडीसोबतचा फोटो आणि व्हिडीओ सुद्धा त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. अजिंक्य सध्या अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेत झळकत आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारमराठी अभिनेतासिनेमा