Join us

मराठमोळ्या अभिनेत्याने गुपचूप केला साखरपुडा, लोकप्रिय मालिकेत साकारलेली मुख्य भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 14:56 IST

अभिनेत्री रुमानी खरेने फोटो शेअर करत दिली माहिती, कोण आहे हा अभिनेता?

गेल्या काही दिवसात अनेक मराठी सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. रेश्मा शिंदे, कौमुदी वालोकर ते नुकतीच शिवानी सोनार-अंबर गणपुळेनेही लग्न केलं. आता यामध्ये आणखी एका अभिनेत्याची भर पडली आहे. 'मन धागा धागा जोडते' नवा ही मालिका काही महिन्यांपूर्वीच संपली. यातील सार्थक राजाध्यक्ष या मुख्य भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्याने गुपचूप साखरपुडा केला आहे. त्याच्या रिंग सेरेमनीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

स्टार प्रवाहवर काहीच महिने चाललेली 'मन धागा धागा जोडते नवा' मालिका. यामध्ये अभिने अभिषेक रहाळकरने (Abhishek Rahalkar) मुख्य भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री दिव्या पुगांवकर आनंदी या भूमिकेत होती. सार्थक-आनंदीची जोडी प्रेक्षकांना खूप पसंत पडली होती. आता हाच सार्थक म्हणजेच अभिषेक रहाळकरने गुपचूप साखरपुडा केला आहे. त्याच्या होणाऱ्या बायकोचं नाव कृतिका आहे. अभिषेक आणि कृतिकाच्या साखरपुड्याचा एक फोटो 'दुर्गा' मालिकेतील अभिनेत्री रुमानी खरेने शेअर केला आहे. Cutiess असं कॅप्शन तिने दिलं आहे. हाच फोटो आता सगळीकडे व्हायरल होत आहे.

अभिषेक आणि रुमानी 'तू तेव्हा तशी' मालिकेत झळकले होते. यानंतर अभिषेक 'मन धागा धागा जोडते नवा' मध्ये दिसला. अभिषेकने मात्र अद्याप त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ही गुडन्यूज चाहत्यांना दिलेली नाही. त्यामुळे अभिषेकच्या खऱ्या आयुष्यातली आनंदी म्हणजे कृतिका नक्की आहे तरी कोण? ती त्याला कुठे भेटली हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेतासोशल मीडियाटेलिव्हिजनटिव्ही कलाकार