Join us
Daily Top 2Weekly Top 5

आधी पतीपासून घटस्फोट, आता स्वतःला दिलं गिफ्ट! माही विजने खरेदी केली शानदार कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 15:34 IST

अभिनेत्री माही विजने आलिशान कार खरेदी केली आहे. माहीचं अनेकांनी सोशल मीडियावर अभिनंदन केलं आहे

टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध जोडी माही विज आणि जय भानुशाली यांच्या घटस्फोटाची बातमी सध्या चर्चेत आहे. वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या या मोठ्या घटनेनंतर अभिनेत्री माही विजने स्वतःसाठी एक महागडी कार खरेदी करून आपले स्वप्न पूर्ण केले आहे. माहीने स्वतः कारचे फोटो शेअर केले नसले तरी, तिची मैत्रीण आरती सिंह हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

आरती सिंहने माहीचा नवीन कारसोबतचा फोटो पोस्ट करत तिचे कौतुक केले आहे. "तू अशा १० गाड्या घे, तुला हा आनंद साजरा करण्याचा हक्क आहे." अशा शब्दांत आरतीने माहीला पाठिंबा दिला. दरम्यान, जय आणि माहीने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून ते आपल्या मुलांचा सांभाळ एकत्रितपणे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

याच काळात माहीचे तिचा मित्र नदीमसोबतचे फोटो व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आले होते. यावर स्पष्टीकरण देताना माहीने सांगितले की, नदीम तिचा जुना मित्र असून तिच्या मुलीने त्याला 'अब्बा' म्हणणे हा जय आणि तिचा दोघांचा निर्णय होता. एकूणच माहीने ही कार खरेदी करुन ती आयुष्यात खऱ्या अर्थाने पुढे गेल्याचा इशारा तिने चाहत्यांना दिला आहे. माही आणि जय या दोघांची घटस्फोटाची बातमी ऐकून चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Divorced, Now This Gift! Mahi Vij Buys a Fancy Car

Web Summary : Amid divorce news, Mahi Vij bought a luxury car, fulfilling a dream. Friend Aarti Singh celebrated her purchase. Mahi clarified photos with a friend, emphasizing moving forward. She and Jay will co-parent their children despite separation, shocking fans.
टॅग्स :जय भानुशालीटेलिव्हिजनटिव्ही कलाकारघटस्फोटलग्न