Join us

'आमच्या ग्रुपमध्ये शिवालीच खादाड'; समीर चौघुलेंनी केली शिवाली परबची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 18:54 IST

Samir chaughule: समीर यांनी एक टास्क देण्यात आला होता. या टास्कमध्ये त्यांना त्यांच्या सहकलाकारांना ठराविक अशी उपमा द्यायची होती.

छोट्या पडद्यावर गाजत असलेला लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे  महाराष्ट्राची हास्यजत्रा. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार लोकप्रिय आहे. त्यामुळे त्यांच्याविषय़ी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायमच उत्सुक असतात. यात बऱ्याचदा या कलाकारांचे सेटवरील किस्से प्रेक्षक आवडीने ऐकतात, वाचतात. विशेष म्हणजे या कलाकारांची पडद्यावर ज्या सुंदर पद्धतीने ट्युनिंग जमते तशीच मैत्री त्यांची पडद्यामागेही आहे. अलिकडेच समीर चौघुले यांने शिवाली परबविषयी एक मजेशीर व्यक्त केलं असून तिची पोलखोल केली आहे.

अलिकडेच समीर चौघुले यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी बोलत असताना शिवालीचं एक सिक्रेट शेअर केला आहे. शिवालीला बिर्याणी प्रचंड आवडत असून ती एकटी २ किलो बिर्याणी आरामात खाऊ शकते असं ते म्हणाले आहेत.

या मुलाखतीमध्ये समीर यांनी एक टास्क देण्यात आला होता. या टास्कमध्ये त्यांना त्यांच्या सहकलाकारांना ठराविक अशी उपमा द्यायची होती. त्यावेळी 'खादड' हा शब्द आल्यावर त्यांनी लगेचच शिवालीचं नाव घेतलं. "जर बिर्याणी समोर आली तर, आमच्या अख्ख्या ग्रुपमध्ये खादाड शिवाली आहे. ती संपूर्ण २ किलो बिर्याणी खाऊ शकते. तिला बिर्याणी खूप आवडते. त्यामुळे जर समोर बिर्याणी असेल तर शिवाली परब आमची खादाड आहे", असं ते म्हणाले.

दरम्यान, बऱ्याचदा हे कलाकार सोशल मीडियावरही एकमेकांची फिरकी घेत असतात. कधी एकमेकांचे मजेशीर फोटो, व्हिडीओ शेअर करतात. तर, काही वेळा एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करत असतात. 

टॅग्स :समीर चौगुलेमहाराष्ट्राची हास्य जत्राटेलिव्हिजनसेलिब्रिटी