Join us

"अत्यंत गोड, लाजाळू...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेसाठी समीर चौघुलेंची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 18:07 IST

Nikhil Bane Birthday : निखिल बनेच्या वाढदिवसानिमित्त समीर चौघुलेंची खास पोस्ट

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या शोमधील विनोदवीर प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करताना दिसतात. अनेक हास्यवीरांच्या मनोरंजनविश्वातील करिअरमध्ये हास्यजत्रेचा मोठा वाटा आहे. निखिल बनेही हास्यजत्रेमुळेच घराघरात पोहोचला. स्किटमध्ये विनोदाचं अचूक टायमिंग साधत बने प्रेक्षकांना पुरेपूर हसवतो. हास्यजत्रेतून लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या निखिलचा आज वाढदिवस आहे. 

निखिलच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता समीर चौघुलेंनी खास पोस्ट केली आहे. चौघुलेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन बनेबरोबरचा फोटो शेअर केला आहे. "हॅपी बर्थडे निखिल बने. अत्यंत गोड, लाजाळू मित्राचा आज वाढदिवस...खूप खूप प्रेम...", असं कॅप्शन देत चौघुलेंनी बनेला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. चौघुलेंच्या या पोस्टवर कमेंट करत अनेक चाहत्यांनी बनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

"लव्ह यू बेबी...", निखिल बनेसाठी स्नेहल शिदमची खास पोस्ट; नेटकऱ्यांमध्ये रंगली चर्चा

 

दोन वर्षांतच मोडलेला मसाबा गुप्ताचा संसार, लेकीच्या घटस्फोटासाठी स्वत:ला दोषी ठरवतात नीना गुप्ता

दरम्यान, निखिल बने सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा तो फोटो आणि व्हिडिओही शेअर करताना दिसतो. हास्यजत्रेबरोबर बने सोनी टीव्हीवरील 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' या मालिकेतही झळकला होता. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रासमीर चौगुलेटिव्ही कलाकार