Join us

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिषने केला साखरपुडा, होणाऱ्या बायकोचा मनोरंजन विश्वाशी खास संबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 13:18 IST

नवी सुरुवात! थाटात पार पडला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा साखरपुडा, फोटो पाहिलेत का?

Maharashtrachi Hasyajatra Actor Engagement : सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे जगभर चाहते आहेत. या विनोदी कार्यक्रमाने अनेक कलाकारांना ओळख मिळवून दिली. त्यातील एक नाव म्हणजे निमिष कुलकर्णी. निमिशने हास्यजत्रेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं आहे. अशातच नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत अभिनेत्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. नुकताच निमिष कुलकर्णीचा साखरपुडा पार पडला आहे. त्याचे सोशल मीडियावर फोटो समोर आले आहेत. 

अभिनेता निमिष कुलकर्णीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाी बातमी दिली आहे.  कोमल भास्कर असं त्याच्या  होणाऱ्या पत्नीचं नाव आहे. "The beginning of forever...", असं कॅप्शन देत त्यांनी साखरपुड्याचे फोटो शेअर करत पोस्ट केले आहेत. अभिनेत्याचे हे फोटो पाहून मराठी सेलिब्रिटींसह त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. हास्यजत्रेत प्रेक्षकांना खळखळून हसवणारा निमिष आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काल २५ जुलै रोजी अभिनेत्याने साखरपुडा केला. 

दरम्यान, निमिष कुलकर्णीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोसह बरीचं कामे केली आहेत. स्टार प्रवाहवरील 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेतही तो झळकला होता. 

कोण आहे होणारी पत्नी?

निमिष कुलकर्णीची होणाऱ्या पत्नीचा मनोरंजन विश्वाशी खास संबंध आहे. कोमल 'लाखात एक आमचा दादा' मालिकेची क्रिएटिव्ह हेड आहे. यापूर्वी तिने दार उघड बये मालिकेच्या क्रिएटिव्ह हेड म्हणून काम सांभाळलं आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारमहाराष्ट्राची हास्य जत्रासोशल मीडिया