Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही हमरेको तुमरेको करतो त्यात ९०% मराठीच.."; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर 'हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची सणसणीत पोस्ट

By देवेंद्र जाधव | Updated: June 20, 2025 15:00 IST

समीर चौघुलेंनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर आवाज उठवला आहे. त्यांनी लिहिलेली सणसणीत पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे

सध्या महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या मुद्द्याने चांगलाच जोर धरला आहे. सरकार शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा अनिर्वाय करण्याचा विचार करत असल्याने सामान्य माणसांनी या मागणीला विरोध केलाय. अशातच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम लोकप्रिय अभिनेते समीर चौघुले यांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सणसणीत पोस्ट लिहिली आहे. मराठी कलाकारांनी सरकारच्या या निर्णयाबद्दल आवाज उठवला नाही, असं बोललं जात होतं. अशातच समीर चौघुलेंनी लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे.

समीर चौघुलेंनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर उठवला आवाज

समीर चौघुलेंनी फेसबुकवर पोस्ट लिहून सांगितलं आहे की, "आम्ही मराठी बोलतो ..जसं जमेल तसं तोडकं मोडकं हिंदी बोलतो ..तेवढं जगायला पुरेसं आहे ..एवढ्या नाजूक आणि लहान वयात मुलांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हिंदी किंवा तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच.."

"आम्ही कार्यक्रमात हमरेको तुमरेको करतो त्या भाषेत ही ९० टक्के मराठीच असतं …कारण आपण ९० टक्के मराठी माणसे याच प्रकारे हिंदीत व्यक्त होतो ..आणि ते फक्त आणि फक्त विनोदापुरतं असतं त्यामुळे आम्हाला आमच्याच कामाचे दाखले कृपया देऊ नका ..आणि जे समाजात दिसतं ते आम्ही दाखवतो .आमच्या “हमरेको तुमरेको”मुळे समाज अचानक हिंदी बोलायला लागला नाहीय…"

"आम्हाला ही हिंदी चित्रपट, हिंदी गाणी, साहित्य आवडतं, आम्हाला हिंदीचा अजिबात राग नाही पण आम्ही सर्व ठिकाणी हट्टाने अभिमानाने मराठीच बोलतो. उदहरणार्थ अगदी मुंबई ते छत्रपती संभाजी नगर या इंडीगोच्या विमान प्रवासात घोषणा फक्त हिंदी आणि इंग्रजीतूनच होतात ..महाराष्ट्रात असुनही मराठीत घोषणा होत नाही हे मी स्वानुभवावरून सांगतोय …त्या विमानात ही मराठीचा गंध नसणाऱ्या हवाई कर्मचाऱ्यांशी आम्ही हट्टाने मराठीतच बोलतो…रिक्षावाल्यांशी ही आम्ही मराठीतच बोलतो..महाराष्ट्रात मराठीच."

टॅग्स :समीर चौगुलेमहाराष्ट्राची हास्य जत्राहिंदीदेवेंद्र फडणवीसमराठी अभिनेतामराठी चित्रपटटेलिव्हिजन