Join us

"...अन् मी बाबांना मिठी मारली!" 'हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 15:53 IST

अभिनेता पृथ्वीक प्रतापने सोशल मीडियावर AI चा वापर करुन वडिलांना मिठी मारली आहे. त्याने लिहिलेली पोस्ट डोळ्यात पाणी आणणारी आहे

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधील सर्वच कलाकार प्रेक्षकांचे आवडते आहेत. या शोमधील सर्वांचा लाडका असाच एक कलाकार म्हणजे पृथ्वीक प्रताप. पृथ्वीकला आपण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'सोबतच विविध माध्यमात अभिनय करताना पाहिलंय. पृथ्वीकने मधल्या काळात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'शिवाय सिनेमा आणि काही युट्यूब व्हिडीओमध्ये अभिनय केलाय. अशातच पृथ्वीकची नवीन पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्याने AI चा वापर करुन बाबांना मिठी मारली आहे.

पृथ्वीकची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

पृथ्वीक प्रतापचे बाबा आता या जगात नाहीत. पृथ्वीक आता एक लोकप्रिय अभिनेता आहे. पण हे पाहायला त्याचे बाबा आज त्याच्यासोबत नाहीत. त्यानिमित्त पृथ्वीकने बाबांचा फोटो AI च्या माध्यमातून शेअर केला आहे. या फोटोत पृथ्वीक बाबांना मिठी मारत आहे. पृथ्वीक लिहितो की, ''मी एक वर्षांचा असताना त्यांना गमावलं. दरवेळी जेव्हा फादर्स डे येतो तेव्हा मला त्यांना मिठी मारायची इच्छा होते. पण ते मी करु शकत नाही. AI तशी भावनिक टूल नाही. पण Prompt च्या जादूने AI ने मला भावुक केलं. मी बाबांना virtually मिठी मारली. AI ने माझा चेहरा काहीसा बदलला आहे पण हा खूप इमोशनल क्षण आहे. फायनली मी पृथ्वीक प्रताप झालोय.''

अशी भावुक पोस्ट पृथ्वीकने शेअर केली आहे. पृथ्वीकची ही पोस्ट वाचून अनेकांनी त्याचं कौतुक केलंय. AI चा चांगला वापर केला असल्याने, पृथ्वीकने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अशाप्रकारे AI च्या जादूने पृथ्वीकने बाबांची आठवण जागवली आहे. पृथ्वीकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये काम करतोय. पृथ्वीकने काही महिन्यांपूर्वी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्न केलं. साध्या पद्धतीने लग्न केल्याने त्याच्या लग्नाचीही खूप चर्चा झाली.

टॅग्स :पृथ्वीक प्रतापआर्टिफिशिअल इंटेलिजन्समहाराष्ट्राची हास्य जत्रामराठी अभिनेताटिव्ही कलाकारटेलिव्हिजन