Join us
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याच्या गाडीचा अपघात, बदलापूर भागात घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 12:12 IST

निखिल बनेनंतर हास्यजत्रेतील आणखी एका अभिनेत्याचा अपघात,हातावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ; चाहते चिंतेत

Viraj Jagtap Accident: महाराष्ट्राची हास्यजत्रा हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असणारा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातून अनेक नवोदित कलाकार घराघरात पोहोचले आहेत, त्यातीलच एक नाव म्हणजे विराज जगताप. नुकतीच हास्यजत्रेतील या अभिनेत्याच्या अपघाताची बातमी समोर आली आहे. आपल्या विनोदी कौशल्याने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या विराज जगतापचा बदलापूर येथे अपघात झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर भागातील आदर्श मंदिराजवळ 24 मार्चला अपघाताची घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. अपघातामुळे अभिनेत्याच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने मनगटावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आल्याचं कळतंय. विराज हा बदलापूर येथे वास्तव्यास आहे.तो त्याच्या मित्राकडे कार्यक्रमासाठी गेला होता. रात्री घरी परत येत असताना त्याच्या गाडीचा भयंकर अपघात झाला. 

वृत्तानुसार,  अभिनेता विराज सुरक्षित आहे पण या अपघातात त्याच्या हाताला जबर मार बसला आहे. मंगळवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली.एका कार्यक्रमाहून रात्री घरी परत येत असताना त्याला गतीरोधकाचा अंदाज आला नाही. गतीरोधकावर पांढरे पट्टे नसल्याने विराजचा गाडीवरचा ताबा सुटला आणि त्याची गाडी घसरली. दरम्यान, या घटनेबद्दल समजताच अभिनेत्याचे चाहते चिंतेत आहेत. तसेच प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त करत आहेत.  गतिरोधकांवर साधे पांढरे पट्टे रंगवण्यासाठीही पालिकेकडे निधी नाही का, असा सवाल बदलापूरकर उपस्थित करत आहेत.

विराज अगदी सामान्य कुटुंबातील मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर संपूर्ण घराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे.  हास्यजत्रेत अनेक छोट्या-मोठ्या स्किटमध्ये तो भूमिका साकारताना दिसतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : 'Maharashtrachi Hasyajatra' actor Viraj Jagtap injured in Badlapur accident.

Web Summary : Viraj Jagtap, famed from 'Maharashtrachi Hasyajatra,' was injured in an accident in Badlapur. He suffered a hand injury requiring surgery after losing control of his vehicle due to an unmarked speed bump. He is safe, but citizens criticize the municipality's negligence.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटेलिव्हिजनसेलिब्रिटीअपघातबदलापूर