किरण माने (kiran mane) हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. किरण माने यांना आपण विविध नाटक, मालिका आणि सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. किरण माने सोशल मीडियावर विविध विषयांवर व्यक्त होताना दिसतात. किरण मानेंनी आंबेडकर जयंतीनिमित्त (dr babasaheb ambedkar jayanti) एक नवीन पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या शाळेत पहिली ते चोथी शिक्षण घेतलं, तिथे गेल्यावर आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय.
किरण माने लिहितात की, "सातारा ! ज्या शाळेत भिमरायानं पहिलं पाऊल ठेवलं... पहिली ते चौथीपर्यन्त शिक्षण घेतलं... त्या शाळेत भिमजयंतीच्या पुर्वसंध्येला प्रमुख पाहुणा म्हणून मला निमंत्रित केलं होतं. यासारखं दुसरं सुख कुठलं असेल सांगा बरं…""रात्री छ. प्रतापसिंह हायस्कूलमधल्या विद्यार्थ्यांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचा जो आनंद घेतलाय, त्याला तोड नाही. फोटोत तुम्हाला स्टेजवर एक मुलगी बसलेली दिसतेय ना… ती जपानी आहे. बुद्धविचारांची अभ्यासक. ‘बुद्धाचा देश’ बघायला ती भारतात आलीय. इथला बुद्ध शोधता-शोधता तिला भीमराया सापडला. एवढा ज्ञानी महामानव ज्या शाळेत शिकला ती शाळा पहायच्या ओढीनं इथं आली."