Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तरूण पोरपोरी होते, पण कुणी रोमान्सच करत नव्हतं...", 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडिओ शेअर करत किरण मानेंची राखीसाठी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 11:02 IST

किरण मानेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन 'बिग बॉस मराठी ४'च्या घरातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी राखी सावंतसाठी पोस्ट लिहिली आहे.

Bigg Boss Marathi 5 : छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे 'बिग बॉस'. लवकरच 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बिग बॉस मराठी ४' हे पर्वदेखील प्रचंड गाजलं. या पर्वात किरण माने हे सर्वाधिक चर्चेत असलेला चेहरा होते. 'बिग बॉस मराठी'मुळे किरण माने प्रसिद्धीझोतात आले. आता नवं पर्व सुरू होत असतानाच किरण मानेंनी 'बिग बॉस मराठी ४'च्या पर्वातील काही आठवणींना उजाळा दिला आहे. 

'बिग बॉस मराठी ४'मध्ये राखी सावंतने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतल्यानंतर सगळं समीकरणच बदलून गेल्याचं पाहायला मिळालं होतं. राखीने घरातील सदस्यांना सळो की पळो करून सोडलं होतं. पण, राखी आल्यानंतर किरण मानेंची वेगळीच बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. राखी आणि किरण मानेंनी 'बिग बॉस मराठी'च्या घरातून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं होतं. याबाबत किरण मानेंनी एक पोस्ट शेअर केली आहे. 

किरण मानेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन 'बिग बॉस मराठी ४'च्या घरातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी राखी सावंतसाठी पोस्ट लिहिली आहे. "बिगबॉस सिझन चार मधल्या या खट्याळ आठवणी...काय झालं भावांनो, आमच्या सिझनमध्ये तरणी पोरंपोरी होती. पण कुणी रोमान्सच करनात. मी म्हणायचो, "आरं करा कायतर गंमतजंमत. प्रेक्षकांची थोडीतरी एन्टरटेनमेन्ट होऊद्या." एकजण म्हणला, "तुमचं वय नाही हे करायचं म्हणून आम्हाला उचकवताय का माने?" म्हणलं च्यायला..."मैं अगर अपनी जवानी के किस्से सुना दूँ बेटा, तो तुम सब लौंडे मेरे पाँव दबाने लग जाओगे!" तेवढ्यात वाईल्ड राखी वाईल्ड कार्ड म्हणून आली ! मग काय...रेस्ट इज हिस्टरी...", असं मानेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, 'बिग बॉस मराठी ४' नंतर आता प्रेक्षक 'बिग बॉस मराठी ५'च्या प्रतिक्षेत आहेत. २८ जुलैपासून 'बिग बॉस मराठी ५' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सीझन रितेश देशमुख होस्ट करताना दिसणार आहे. 'बिग बॉस मराठी ५'मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीकिरण मानेराखी सावंतटिव्ही कलाकार