Join us

KBC 17: दोन बच्चन आमनेसामने! सुनील ग्रोव्हरने बिग बींसोबत केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:12 IST

'कौन बनेगा करोडपती १७'च्या सेटवर अमिताभ बच्चन आणि सुनील ग्रोव्हर सहभागी झाले होते. तेव्हा सुनील ग्रोव्हरने बिग बींसोबत भन्नाट डान्स केला

अभिनेता-कॉमेडियन सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) नुकताच 'कौन बनेगा करोडपती १७' (KBC 17) च्या सेटवर हजर होता. 'केबीसी'च्या आगामी एपिसोडमध्ये सुनील ग्रोव्हर आणि शोचे होस्ट अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यात झालेली धमाल-मस्ती आणि डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावेळी सुनीलने अमिताभ यांच्यासारखाच मेकअप करुन बिग बींना खळखळून हसवलं.

अमिताभ बच्चन यांच्यासोबत डान्स

KBC 17 च्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, ७०-८० च्या दशकातील हिट गाण्यावर अमिताभ बच्चन आणि सुनील ग्रोव्हर यांनी मिळून डान्स केला. अमिताभ बच्चन यांनी मोठ्या उत्साहाने सुनीलच्या स्टेप्स फॉलो केल्या आणि दोघांनी मिळून सेटवर जबरदस्त वातावरण निर्माण केलं. हा डान्स परफॉर्मन्स पाहून सेटवरील प्रेक्षक आणि उपस्थित असलेले इतर स्पर्धकही खूप खुश झाले आणि सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

कृष्णा अभिषेकची खास उपस्थिती

सुनील ग्रोव्हरसोबत यावेळी अभिनेता कृष्णा अभिषेक सुद्धा सहभागी झाला होता. कृष्णाने सुनील ग्रोव्हर आणि अमिताभ बच्चन यांच्या या डान्सचा व्हिडीओ शेअर करत त्याला कॅप्शन दिलं की, "दादा (अमिताभ बच्चन) आणि भाई (सुनील ग्रोव्हर) यांचा डान्स पाहून खूप आनंद झाला. पण, आता मला एकच प्रश्न सतावतोय की, या परफॉर्मन्ससाठी भाईला किती पगार मिळाला?" कृष्णाने मस्करीमध्ये केलेली ही कमेंट चाहत्यांना खूप आवडली आहे. 'केबीसी १७' चा हा विशेष एपिसोड लवकरच प्रसारित होणार आहे. अमिताभ बच्चन आणि सुनील ग्रोव्हरची ही केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sunil Grover dances with Amitabh Bachchan on KBC 17 set.

Web Summary : Sunil Grover, dressed as Amitabh Bachchan, danced with the star on KBC 17. Their energetic performance thrilled the audience. Krishna Abhishek shared the video, jokingly asking about Sunil's payment. The episode is eagerly awaited.
टॅग्स :अमिताभ बच्चनसुनील ग्रोव्हरकौन बनेगा करोडपतीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार