Join us

सेटवर दारु प्यायल्याने अन् जास्त मानधनाची मागणी केल्याने इंडस्ट्रीने केलेलं बॉयकॉट; आता ४ वर्षांनी अभिनेत्याचं कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 15:44 IST

उद्धट आणि अहंकारी स्वभामुळे अनेक मालिकांमधून या अभिनेत्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता हाच अभिनेता कमबॅकसाठी सज्ज आहे

करिअरच्या शिखरावर असताना अनेक अभिनेत्यांना त्यांच्या स्वभावामुळे पुढे कामं मिळत नाहीत. टीव्ही इंडस्ट्रीतील असाच एक दिग्गज अभिनेता. जो करिअरच्या शिखरावर असताना त्याला कामं मिळणं बंद झालं. पण आता तब्बल ४ वर्षांनी हा अभिनेता पुन्हा टीव्ही इंडस्ट्रीत झळकणार आहे. हा अभिनेता आहे करण पटेल.

लोकप्रिय टीव्ही शो 'ये है मोहब्बतें' (Yeh Hai Mohabbatein) फेम अभिनेता करण पटेल (Karan Patel) तब्बल चार वर्षांच्या ब्रेकनंतर टेलिव्हिजनवर दमदार पुनरागमन करत असल्याची चर्चा आहे. करणने स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे या कमबॅकचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

करणची कमबॅक घोषणा

करण पटेलने नुकतंच इंस्टाग्रामवर एक शर्टलेस फोटो शेअर करत त्याच्या कमबॅकची माहिती दिली. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "मी घोषणा करतो की, पुढच्या वर्षी याच महिन्यापर्यंत माझं पुनरागमन असेल. आणि हे कमॅक आधीपेक्षा भव्यदिव्य आणि महत्वाचं असेल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि हवं ते साध्य करा." या पोस्टमुळे करणच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

'लाफ्टर शेफ ३' मध्ये दिसणार?

कॉमेडी कुकिंग शो 'लाफ्टर शेफ सीझन'चा तीसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सूत्रांनुसार, करण पटेलला या शोचा नवा सीझन ऑफर करण्यात आला आहे. मात्र, करणने याबाबत अद्याप याविषयी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

करणच्या करिअरवर ब्रेकवर जाण्याचं कारण

करण पटेल हा एकेकाळी टेलिव्हिजनचा खूप लोकप्रिय चेहरा होता. त्याने 'कसम से', 'काव्यांजली', 'कस्तुरी' आणि 'ये है मोहब्बतें' सारख्या हिट मालिकांमध्ये काम केलं आहे. 'कस्तुरी' मालिकेनंतर त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती, ज्यामुळे त्याला 'टीव्हीचा शाहरुख खान' म्हटलं जाऊ लागलं. मात्र, या अचानक मिळालेल्या स्टारडममुळे त्याच्यात अहंकार वाढला आणि त्याने अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सना नकार दिला.

जास्त फीची मागणी करणं आणि काहीवेळा सेटवर दारू पिऊन जाणं, यांसारख्या सवयींमुळे निर्मात्यांनी त्याला काम देणं बंद केले. गेली तीन वर्ष काहीच काम न मिळाल्यामुळे घरी बसल्यानंतर त्याला आपल्या चुकांची जाणीव झाली. आता या चुका सुधारून करण पटेल पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Karan Patel's comeback after industry boycott due to misconduct.

Web Summary : Karan Patel, famed for 'Yeh Hai Mohabbatein,' is set to return to television after a four-year hiatus. His comeback follows a period of being sidelined due to unprofessional behavior, including demanding higher fees and drinking on set. He is rumored to appear in 'Laughter Chef 3'.
टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारबॉलिवूडशाहरुख खान