Join us

कपिलने पंतप्रधानांना शो मध्ये येण्यासाठी दिलं आमंत्रण, मोदी म्हणाले, 'कधीतरी नक्की येऊ पण...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2023 08:48 IST

कपिलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा सांगितला.

कॉमेडी नाईट्स विद कपिल शर्मा शोची (Comedy Nights With Kapil Sharma) लोकप्रियता जगजाहीर आहे. त्याच्या शो मध्ये येण्यासाठी सेलिब्रिटी एका पायावर तयार असतात. कपिलही सर्वांची खिल्ली उडवत आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना खळखळून हसवतो. केवळ बॉलिवूडच नाही तर क्रिकेट, राजकारण, टीव्ही मालिका, आध्यात्मिक गुरु यांनाही कपिलने शो मध्ये बोलवले आहे. इतकंच काय त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही (PM Narendra Modi) आपल्या शो मध्ये येण्याचं आमंत्रण दिलं होतं.

आज तकला दिलेल्या मुलाखतीत कपिल शर्माने अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. इतरांना प्रश्न विचारणारा कपिल इथे मात्र प्रश्नांची उत्तरं देत होता. यावेळी कपिलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा सांगितला. 'नरेंद्र मोदी शोमध्ये येणार का?'असा प्रश्न कपिलला विचारण्यात आला असता तो म्हणाला, 'मी जेव्हा नरेंद्र मोदींना भेटलो तेव्हा मी त्यांना शोमध्ये येण्याचे आमंत्रण दिले होते. तेव्हा ते म्हणाले, 'येऊ कधीतरी. सध्या विरोधक खूप कॉमेडी करत आहेत.'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कपिलला नकार दिला नाही. म्हणजेच कधीतरी ते सुद्धा कपिल शर्मा शो मध्ये दिसू शकतात हे नक्की आहे. कपिल शर्माचा 'झ्विगॅटो' हा सिनेमा १७ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या कपिल सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

टॅग्स :कपिल शर्मा नरेंद्र मोदीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार