एका प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्न न करण्याचा आणि मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने दिलेलं कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. ही अभिनेत्री आहे जया भट्टाचार्य. प्रसिद्ध टीव्ही मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मधील अभिनेत्री जया भट्टाचार्य यांनी अनेक वर्षांपासून लग्न का केले नाही, याबद्दलचं कारण सांगितलं आहे. तब्बल ११ वर्षे बॉयफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहूनही तिने लग्न करण्याचा निर्णय का घेतला नाही, याचे स्पष्टीकरण दिलं आहे.म्हणून लग्न आणि मूल नकोय
एका मुलाखतीत जया यांनी सांगितलं की, ''सुरुवातीला माझा पार्टनरसोबत लग्न करण्याचा विचार होता, परंतु काही गोष्टी अशा घडल्या की मला त्या समजल्या नाहीत. आमच्या नात्याला पाच वर्षे पूर्ण झाल्यावर माझा विचार पक्का झाला की मला लग्न करायचं नाही. पण माझ्या पार्टनरला लग्न करायचं होतं. त्याला मूल सुद्धा हवं होतं. पण मला मूल नको होते. मी विचार केला की, मी जर कामावर गेले तर माझ्या मुलाला कोण शिकवणार, माझी मोलकरीण? मला माझ्या आई-वडिलांचीही काळजी घ्यायची होती. पण माझ्या पार्टनरला मुलांची इच्छा होती. याच कारणामुळे आम्ही लग्न केलं नाही.''
जया या दिग्दर्शक माजाहिर रहिमसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. रहिम हे जयापेक्षा १९ वर्षांनी मोठे होते. हे दोघे ११ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. परंतु नंतर त्यांनी परस्पर संमतीने एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. जया यांना त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं होतं. परंतु रहिम यांचे विचार वेगळे होते. त्यामुळे दोघं वेगळे झाले. सध्या जया भट्टाचार्य या टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.