Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी अभिनेत्याने धरला ऋतुजा बागवेच्या तालावर ठेका; 'अंगारों से' वर केला जबरदस्त डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 15:46 IST

Rutuja bagawe: ऋतुजा सध्या हिंदी मालिकेत काम करत असून तिच्या सहकलाकारासोबत तिने 'अंगारो सें' या गाण्यावर डान्स केला आहे.

सध्या सोशल मीडियावर दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या 'पुष्पा 2' या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. यामध्येच काही दिवसांपूर्वी या सिनेमातील 'अंगारों से' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. विशेष म्हणजे हे गाणं रिलीज झाल्यापासून तुफान लोकप्रिय ठरलं आहे. या गाण्यावर अनेकांनी रिल्सदेखील केले आहेत.

आतापर्यंत 'अंगारों से' या गाण्यावर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी ट्रेंडिंग रिल्स शेअर केले आहेत. यामध्येच आता अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने सुद्धा या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत अभिनेता अंकित गुप्ता यानेही ताल धरला आहे.

सध्या ऋतुजा 'माटी से बंधी डोर' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. याच मालिकेतील अभिनेता अंकिता गुप्ता याने ऋतुजासोबत अंगारों से या गाण्यावर डान्स केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांची केमिस्ट्री नेटकऱ्यांना भलतीच आवडली आहे.

दरम्यान, अनेक गाजलेल्या मराठी नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम करणाऱ्या ऋतुजाने आता हिंदी मालिका विश्वात पदार्पण केलं आहे. नुकतीच तिची माटी से बंधी डोर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेत ऋतुजासोबत अभिनेता अंकित गुप्ता मुख्य भूमिका साकारत आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारअल्लू अर्जुनरश्मिका मंदानाऋतुजा बागवे