येत्या १ मे, महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात येणार आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता व वाचता येते का, याची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यासंबंधी अनेक रिक्षाचालकांनी नाराजी व्यक्त केली असून संपाचा इशारा दिला आहे. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून याविषयी त्यांचं मत मांडलं आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी लिहितात की, ''रिक्षा चालकांना तीन महिन्याचा व्यवहारउपयोगी मराठी शिकवण्याचा ऑनलाइन क्लास शासनाने तयार करून कंपलसरी करावा..तीन महिन्यांनी ऑनलाइन परीक्षा घेवून.पास झालेल्याचा रिक्षा परवाना कायम ठेवून,नापासना उत्तीर्ण होई पर्यंत परवाना निलंबित करावा.. हीच पद्धत परभाषिक भाजी विक्रेते,रस्त्यावरील विक्रेते यांच्यात ही राबवता येईल. आपण नागरिकांनी सुद्धा व्यवहारात ठामपणे फक्त मराठीच बोलावे भाषा संवर्धना साठी हे आवश्यक आहे.. महाराष्ट्रात मराठी आलं पाहिजे..''
Web Summary : Maharashtra plans to make Marathi compulsory for rickshaw drivers. Sachin Goswami suggested online Marathi classes and exams for drivers and vendors. Failure results in license suspension. Citizens should firmly speak Marathi.
Web Summary : महाराष्ट्र रिक्शा चालकों के लिए मराठी अनिवार्य करने की योजना बना रहा है। सचिन गोस्वामी ने चालकों और विक्रेताओं के लिए ऑनलाइन मराठी कक्षाएं और परीक्षाएँ सुझाईं। असफल होने पर लाइसेंस निलंबित कर दिया जाएगा। नागरिकों को दृढ़ता से मराठी बोलनी चाहिए।