Join us
Daily Top 2Weekly Top 5

'गौरव मोरेला कशी मुलगी हवी?' स्वत:च केला खुलासा; म्हणाला, "इंडस्ट्रीतली नको कारण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 12:17 IST

गौरवने मोरेने सांगितला लग्नाचा प्लॅन, कशी मुलगी हवी? म्हणाला...

'फिल्टरपाड्याचा बच्चन' अशी ओळख मिळवलेला गौरव मोरे (Gaurav More) 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून घराघरात पोहोचला. त्याची हेअरस्टाईल, भाषा, विनोदाचं टायमिंग सगळंच गाजलं. काही दिवसांपूर्वीच गौरवने हास्यजत्रा शो सोडला. सध्या तो 'मॅडनेस मचाएंगे' या हिंदी कॉमेडी शोमधून सर्वांना हसवतोय. नुकतंच गौरवने त्याला आयुष्यात कशी लाईफ पार्टनर हवी याचा खुलासा केला.

गौरव मोरे त्याच्या अचूक विनोदाच्या टायमिंगसाठी ओळखला जातो. 'मॅडनेस मचाएंगे' मधून त्याने हिंदी प्रेक्षकांनाही त्याचं टॅलेंट दाखवून दिलंय. नुकतंच 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत गौरवने त्याला कशी मुलगी हवी आणि लग्नाचे काय प्लॅन्स आहेत याचा खुलासा केला. तो म्हणाला, "प्लॅन्स आहेत. पण मी घरी सांगितलंय सारखा लग्नाचा विषय काढू नका. म्हणून ते आता बोलत नाहीत. शांत आणि चांगली मुलगी हवी. माझं काम असं आहे की मी बाहेर असतो, वेळ देता येत नाही. मी मित्रांमध्ये राहणारा पोरगा आहे. त्यामुळे ते समजून घेणारी हवी. मी इंडस्ट्रीमधली मुलगी करणार नाही. कारण दोघंही जर या क्षेत्रातले असो तर सगळं सारखं होऊन जाईल. ती शूटिंगवरुन येईल, मी शूटवरुन येईल. वेगळं क्षेत्र असेल तर तिच्या क्षेत्रात काय चाललंय, काय समस्या आहेत हे मलाही कळेल."

गौरवने मुलाखतीत हास्यजत्रा शो सोडण्यामागचं कारणही सांगितलं. "कामात तोचतोचपणा येत होता. संवाद बोलण्याआधीच रिअॅक्शन येत होत्या. आपण खूपच मेकॅनिकल झालोय असं मला वाटायला लागलं होतं. म्हणून मी थांबायचा निर्णय घेतला. तेव्हाच हिंदी शोची ऑफर आली होती. तसंच हा शो मर्यादित कालावधीचा असणार होता म्हणून मी ऑफर स्वीकारली", असं तो म्हणाला.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रासेलिब्रिटीमराठी अभिनेतालग्नसोशल मीडिया