Join us

साथ निभाना साथिया: 'या' एका चुकीमुळे गोपी बहूने गमावली मालिका; कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 14:33 IST

Gia manek:अचानकपणे तिने या मालिकेतून एक्झिट घेतली आणि तिच्या जागी देबोलीना भट्टाचार्जी गोपी बहू म्हणून प्रेक्षकांसमोर आली.

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'साथ निभाना साथिया'. या मालिकेने टीआरपीमध्ये अनेक रेकॉर्ड मोडले. विशेष म्हणजे या मालिकेतील गोपी बहू (Gopi Bahu)  आणि कोकिला मोदी या सासू-सुनेच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सुरुवातीच्या काळात या मालिकेत गोपी बहूची भूमिका अभिनेत्री जिया मानेक (Giaa Manek) साकारत होती. परंतु, अचानकपणे तिने या मालिकेतून एक्झिट घेतली आणि तिच्या जागी देबोलीना भट्टाचार्जी गोपी बहू म्हणून प्रेक्षकांसमोर आली. मात्र, जिया मानेकरने प्रेक्षकांच्या मनावर जी जादू केली होती ती विसरणं कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. त्यामुळेच जियाने ही मालिका अचानकपणे का सोडली हे जाणून घेऊयात.

अहमदाबाद येथे लहानाची मोठी झालेल्या जियाने साथ निभाना साथिया या मालिकेतून तिच्या करिअरची सुरुवात केली. विशेष म्हणजे या पहिल्याच मालिकेने तिला तुफान लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेनंतर ती २०१२ मध्ये झलक दिखला जा या कार्यक्रमात दिसली. परंतु, सूत्रांच्या माहितीनुसार, जियाने या कार्यक्रमात सहभागी होऊ नये अशी साथ निभाना साथियाच्या निर्मात्यांची इच्छा होती. मात्र, जिया या कार्यक्रमात सहभागी होत असल्याचं निर्मात्यांच्या लक्षात आलं त्याचवेळी त्यांनी जियाला साथ निभाना साथियामधून काढण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, 'झलक दिखला जा' या शोमुळे तिला हातची चांगली मालिका सोडावी लागली. त्यानंतर २०१९ मध्ये ती 'मनमोहिनी' या मालिकेत झळकली. सध्या 'जियाला तेरा मेरा साथ रहे' या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेपूर्वी ती 'ना घर के ना घाट के' या चित्रपटातही दिसली होती. 

टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजनदेवोलिना भट्टाचार्जी