Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 10:05 IST

नऊवारी साडी, हातात काठी आणि डोळ्यावर काळा चष्मा... सरु आजींचा उत्साह तर पाहा

टेलिव्हिजनवर गाजलेल्या मराठी मालिकांपैकी एक म्हणजे 'देवमाणूस'. या मालिकेचा आता भाग दोन सुरु झाला आहे. 'देवमाणूस मधला अध्याय' असं याचं नाव आहे. अभिनेता किरण गायकवाड यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. शिवाय 'रात्रीस खेळ चाले'फेम अण्णा नाईक म्हणजेच माधव अभ्यंकर हे देखील मालिकेत दिसत आहेत. दरम्यान मालिकेच्या काही एपिसोडमध्ये प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलही (Gautami Patil) दिसणार आहे. तिचा आणि किरण गायकवाडचा प्रोमोही व्हायरल झाला होता. आता गौतमी पाटील आणि मालिकेतील सरु आजींचा व्हिडिओही समोर आला आहे.

गौतमी पाटीलने 'पाव्हणं जेवला काय' या गाण्यातून सर्वांनाच वेड लावलं होतं. 'देवमाणूस' मधील सरु आजींनीही आता गौतमीसोबत ठेका धरला आहे. गौतमी मालिकेत काही एपिसोडसाठी आली असल्याने शूटिंगवेळी तिने कलाकारांसोबत डान्स केला. यावेळी सरु आजींसोबतचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. गौतमी प्रमाणेच सरु आजीही एकदम जोशात 'पाव्हणं जेवला काय'वर ठेका धरत आहेत. नऊवारी साडी, हातात काठी आणि डोळ्यावर काळा चष्मा या त्यांच्या नेहमीच्याच लूकमध्ये त्या दिसत आहेत. झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर व्हिडिओ शेअर केला आहे. 

दरम्यान, श्वेता शिंदेच्या "देवमाणूस मधला अध्याय" या मालिकेत गौतमीला अभिनयाची संधी देण्यात आली आहे. डॉ अजितकुमार देवला तिच्या नखरेल अदांनी घायाळ करण्यासाठी गौतमी मालिकेत एन्ट्री घेत आहे.यापूर्वी गौतमीने व्हिडीओ अल्बम 'घुंगरू' तसेच काही चित्रपटांमध्ये झळकली आहे. त्याचबरोबर अलिकडेच गौतमीने स्टार प्रवाहच्या रिऍलिटी शो 'होऊ दे धिंगाणा'मध्ये हजेरी लावली होती. त्यात आता 'शिट्टी वाजली रे' या कुकिंग रिएलिटी शोमधून गौतमी प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.  त्यामुळे छोट्या पडद्यावर तिला अभिनय करताना चाहते सुद्धा उत्सुक झाले आहेत.  

टॅग्स :गौतमी पाटील'देवमाणूस २' मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकारनृत्य