Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदाच्या गाण्यावर गौरव मोरेचा अफलातून डान्स; माधुरीनेही दिली त्याला साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 09:25 IST

Gaurav more: गौरवचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

फिल्टरपाड्याचा बच्चन या नावाने तुफान लोकप्रिय झालेला अभिनेता, विनोदवीर म्हणजे गौरव मोरे (gaurav more). उत्तम अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्याने प्रत्येक मराठी प्रेक्षकाच्या मनावर राज्य केलं. सध्या गौरव मॅडनेस मचाएंगे या हिंदी रिअॅलिटी शोमध्ये झळकत आहे. त्यामुळे सध्या तो सातत्याने चर्चेत येत आहे. यामध्येच त्याचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याने गोविंदाच्या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.

१९९८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेला 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा सिनेमा साऱ्यांनाच ठावूक असेल. या सिनेमात गोविंदाने मुख्य भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या सिनेमापेक्षा त्यातील गाणी जास्त लोकप्रिय ठरली. या सिनेमामधल्याच 'किसी डिस्को में जाएं' या गाण्यावर गौरव मोरेने डान्स केला आहे. यात त्याला अभिनेत्री माधुरी पवार हिने साध दिली आहे.

माधुरीने तिच्या इन्स्टाग्रामवर गौरवसोबतच्या डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघांनी जवळपास गोविंदाच्या सगळ्या स्टेप कॉपी करायचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. “आजूबाजूला निसर्गरम्य परिसर… त्यात डान्सवर प्रेम करणारी दोन माणसं आणि सुंदरसं गाणं” असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, गौरव आणि माधुरी ही जोडी लवकरच अल्याड पल्याड या सिनेमात झळकणार आहेत. त्यांचा हा सिनेमा येत्या १४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्यांच्या व्यतिरिक्त सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर ही कलाकार मंडळी झळकणार आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारमराठी अभिनेतामहाराष्ट्राची हास्य जत्रा